Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *आमदार श्री.विजयभाऊ...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा हस्ते तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तथा नगर पंचायत सावलीचे नगरसेवक यांची बैठक संपन्न*

*आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा हस्ते तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तथा नगर पंचायत सावलीचे नगरसेवक यांची बैठक संपन्न*

*आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा हस्ते तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तथा नगर पंचायत सावलीचे नगरसेवक यांची बैठक संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा हस्ते तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तथा नगर पंचायत सावलीचे नगरसेवक यांची बैठक मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे जनसंपर्क कार्यालय सावली येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी सावली तालुक्यातील नागरिकांच्या व नगर पंचायत सावलीच्या विविध समस्यां आमदार.मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी जाणून घेतल्या संबंधित अधिकारी यांना तश्या सूचना देण्यात आले आहे.

तसेच नुकतेच अत्याधुनिक तंत्रज्ञान बनावटीचे मोबाईल कॅन्सर स्क्रीनिंग हॉस्पिटल ऑन व्हील्स आमदार.मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी जनसेवेत समर्पित केली.महाराष्ट्राच्या दुर्गम भागात पोहोचून कर्करोगांची तपासणी करणार.ज्यामध्ये प्रामुख्याने स्तनाचा, तोंडाचा, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रारंभिक टप्प्यात शोधून रुग्णांना जीवनदान देणार महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी आणि शहरी झोपडपट्टी वस्तीत राहणारे उपेक्षित आणि वंचित कुटुंब जे आर्थिक स्थितीमुळे कर्करोग तपासणी करू शकत नाही अश्या कुटुंबांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल.उपेक्षित लोकसंख्येला कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे.या संबंधित सावली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी नियोजनासंबंधित बैठक घेण्यात आली.यावेळी सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती मा.दिनेश पाटील चिटणुरवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,महिला तालुकाध्यक्ष सौ.उषाताई भोयर,सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मा.किशोर कारडे,युवक शहराध्यक्ष मा.अमर कोनपत्तीवार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरुषोत्तम चुदरी,नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लता लाकडे,उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,शहराध्यक्षा सौ.भारती चौधरी,माजी तालुकाध्यक्ष मा.राजू सिद्धम,नगरसेविका सौ.साधना वाढई,सौ.सिमा संतोषवार,सौ.ज्योती गेडाम, सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती शिंदे,सौ.पल्लवी ताटकोंडावार, सौ.प्रियंका रामटेके, नगरसेवक मा.अंतबोध बोरकर,मा.प्रफुल वाळके, मा.प्रीतम गेडाम,मा.सचिन संगीडवार,मा.नितेश रस्से, मा.गुणवंत सुरमवार तसेच मा.नितीन दुवावार,मा.सुनील पाल,मा.ज्ञानदेव बारसागडे,मा.श्रीकांत बहिरवार, मा.टिकाराम म्हशाखेत्रि,मा.भोगेश्वर मोहुर्ले,मा.पंकज कागदेलवार व जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा. कमलेश गेडाम,बादल गेडाम तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...