Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / संभाजी भिडे याच्यावर...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

संभाजी भिडे याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

संभाजी भिडे याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

घुग्घूस शहर काँग्रेसचे निवेदनातून मागणी

 

 

घुग्घूस : शिव प्रतिष्ठानाचे प्रमुख मनोहर (संभाजी ) भिडे यांनी अमरावती येथील एका व्याख्यान कार्यक्रमात जागतिक अहिंसेचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर अगदी खालच्या स्वरूपात हीन दर्जाचे आरोप करीत आक्षेपार्ह विधान केलेले आहे.

महात्मा गांधी हे करमचंद गांधी यांचा मुलगा नसून एका मुस्लिम जमीनदारांचा मुलगा आहे

असा किळसवाणा वक्तव्य भिडे यांनी केला आहे.

भिडे सतत बेताल वक्तव्य करीत असतो युवकांचे माथे भडकविण्याचा कार्य करीत असतो मात्र त्याला सत्तेचा अभय असल्याने त्यांच्यावर कारवाई केल्या जात नसल्याचा आरोप काँग्रेसने केला असून राज्यातील गृहमंत्री हे कोमात असल्यानेच भिडे सारखा वटवट करीत असल्याचा आरोप ही काँग्रेसने केला आहे.

 

भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व एस.सी. महीला सेल अध्यक्ष दिप्ती सोनटक्के यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  स.पो.नी संगिता हेलोंडे यांना निवेदनातुन केली आहे.

 

याप्रसंगी संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनोहर भिडे मुर्दाबादच्या घोषणा देत शिंदे फडणवीस शासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

 

याप्रसंगी काँग्रेस जिल्हा महिला सचिव दुर्गा पाटील,सुजाता सोनटक्के,माधुरी सुटे,वैशाली दुर्योधन,सुवर्णा कामतवार,मंगला उगे,वंदना लोहकरे,रिना हाडके,शोभा पटेल काँग्रेस नेते सैय्यद अनवर,शामरावजी बोबडे,सुधाकर बांदूरकर,अलीम शेख,स्टीव्हन गुंडेटी, शमीउद्दीन शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर, थामस अर्नाकोंडा,शहजाद शेख, देव भंडारी,बालकिशन कुलसंगे,दिपक पेंदोर,आकाश चिलका,रफिक शेख,अभिषेक सपडी,भैय्या भाई,बोकडे गुरुजी,कासम शेख,अमित सावरकर,सन्नी कुम्मरवार,सुनील पाटील,रंजित राखुंडे,अंकुश सपाटे,अजय त्रिवेणी,व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...