Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *शिवसेना पक्षप्रमुख...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “जनसेवा सप्ताह” सुरू* *@ दिवस तिसरा* *तिसऱ्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील आपदग्रस्तांना आर्थिक मदत*

*शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “जनसेवा सप्ताह” सुरू* *@ दिवस तिसरा*    *तिसऱ्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील आपदग्रस्तांना आर्थिक मदत*

*शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “जनसेवा सप्ताह” सुरू* *@ दिवस तिसरा*

 

तिसऱ्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील आपदग्रस्तांना आर्थिक मदत

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा /भद्रावती :

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात “जनसेवा दिन सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत संपूर्ण आठवडाभर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज (दि.२९) ला जनसेवा दिन सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील आपादग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली.

भद्रावती तालुक्यातील वाघेडा येथील मनोज टोंगे यांचे गोठ्याला आज (दि.२९) च्या रात्री एक वाजताच्या सुमारास आग लागली. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही. गावकऱ्यांच्या अथक परिश्रमाने सुमारे चार तासात आग विझविण्यात आली. तसेच गोठयातील बैलजोडी सुखरुप वाचविण्यात यश आले. वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांना ही घटना कळताच रात्रीच वाघेडा येथे आपतकालीन मदत पोहचविण्यात आली.

वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी वाघेडा येथे मनोज टोंगे यांची स्वत: वैयक्तीक भेट घेतली व वास्तविक परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांना तात्काळ मदत केली.

या प्रसंगी हनुमान टाले, मनोज कसारे, राकेश बोथले बंडु काकडे, प्रफुल थेरे, मंगेश भोयर व गावकरी मंडळी घटनास्थळी उपस्थित होते.

सोबतच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे, मिथुन खोब्रागडे, अक्षय बंडावार यांची घटनास्थळी उपस्थिती होती.

यावेळी वाघेडा येथील ग्रामस्थ सुरेश महादेव वराटे व देवराव गणपत टाले यांचे बैल अनुक्रमे सर्पदंशाने व विद्युत करंटने मृत्युमुखी पडले, हे समजल्यावर त्यांनासुध्दा तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली.

BOX

*शिवसेना (उबाठा) इनकमिंग सुरूच*

*शिवसेना (उबाठा) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तथा पक्षाच्या विचारधारेला प्रेरीत होवून पक्षप्रवेश सुरू*

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन भद्रावती तालुक्यातील बेलगाव(भु.), नेताजी नगर, विंजासन आणि गौतम नगर येथील युवकांनी व महिलांनी शिवबंधन बांधून शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला.

वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत या तरुणांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे.

याप्रसंगी भद्रावती शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख व नगरसेवक नरेंद्र पढाल यांच्या नेतृत्वात बेलगाव(भू.) ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर गाडगे, शिवसेना उपशहर प्रमुख अरुण घुगुल यांच्या नेतृत्वात सचिन पाचभाई, सुनील पायघन, नरेश कचाटे, सुरज बावणे, विकास बावणे, कृष्णा मोहितकर, रामा टाले आणि भावना खोब्रागडे यांच्या नेतृत्वात व्यंकट रमण, सुरेश पेटकर, शामलता पेटकर अश्विनी टिकले, वनमाला टिकले यांचा शिवबंधन बांधून पक्षप्रवेश करण्यात आले.

या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) महिला जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, विधानसभा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना भद्रावती तालुका अध्यक्ष राहुल मालेकर, प्रशांत कारेकर, रोहीत वाभिटकर, संतोष माडेकर, गोपाल सातपुते व पदाधिकारीसह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होते

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...