Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *जनतेचा जीव व शेती महत्त्वाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*जनतेचा जीव व शेती महत्त्वाची की खाणी ?* *कोळसा खाण क्षेत्रात चहूबाजूंनी पूर परिस्थिती* *चंद्रपूर जिल्ह्यात जागोजागी कोळसा खाणींनी उभे केलेल्या मातीच्या ढीगाऱ्यामुळे गाव, शेती व मनुष्य संकटात* *वेकोली क्षेत्रातील पूरबाधितांना खनिज निधीतून तात्काळ आर्थिक मदत द्यावी - रविंद्र शिंदे*

*जनतेचा जीव व शेती महत्त्वाची की खाणी ?*    *कोळसा खाण क्षेत्रात चहूबाजूंनी पूर परिस्थिती*    *चंद्रपूर जिल्ह्यात जागोजागी कोळसा खाणींनी उभे केलेल्या मातीच्या ढीगाऱ्यामुळे गाव, शेती व मनुष्य संकटात*    *वेकोली क्षेत्रातील पूरबाधितांना खनिज निधीतून तात्काळ आर्थिक मदत द्यावी - रविंद्र शिंदे*

*जनतेचा जीव व शेती महत्त्वाची की खाणी ?*

 

*कोळसा खाण क्षेत्रात चहूबाजूंनी पूर परिस्थिती*

 

*चंद्रपूर जिल्ह्यात जागोजागी कोळसा खाणींनी उभे केलेल्या मातीच्या ढीगाऱ्यामुळे गाव, शेती व मनुष्य संकटात*

 

वेकोली क्षेत्रातील पूरबाधितांना खनिज निधीतून तात्काळ आर्थिक मदत द्यावी - रविंद्र शिंदे

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-चंद्रपूर जिल्ह्यात जागोजागी वेकीलिने उभे केलेले ढिगारे आणि खाणी आहेत. याच खाणीमुळे चंद्रपूर जिल्हा आतून पोकळ झाला आहे. यामुळे जिल्ह्यात गाव, शेती व मनुष्य यांवर मोठे संकट उभे राहत आहे. खाणीच्या ढिगाऱ्यांमुळे आसपासच्या गावाला कृत्रिम पुराचा वेढा तयार झाला आहे व तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. गाव व शहराचा संपर्क तुटला आहे, हा दरवर्षी पावसाळ्यात एक चिंतेचा विषय बनला आहे व कायमस्वरुपी उपाययोजना न केल्यास दरवर्षीच या समस्येला समोर जावे लागणार आहे.

घुग्गुस येथे जमीन कोसळून मोठा बोगदा तयार झाला होता. वेकोली ढिगाऱ्यामुळे तापमानात फरक पडून शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठे नुकसान होत आहे. वेकोलीच्या काटेरी झुळपामुळे जंगली जनावरे आणि नागरिकांमध्ये संघर्ष सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकात हे जंगली जनावरे धुमाकूळ घालत आहे. पावसाळ्यात या ढिगाऱ्यामुळे नदीकाठच्या परिसरात महापुराची परिस्थिती निर्माण होत आहे.    

या सर्व समस्या वेकोलिची देण आहे.  मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील पावसाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदी आसपासच्या परिसरात पुराची परिस्थिती आहे. वेकोलीच्या ढिगाऱ्यामुळे या पुराचे पाणी गावागावात शिरले आहे व खाणीलगत असलेली गावे पाण्याखाली येत आहे.

१९९४ मधे आलेल्या महापुरापेक्षा पेक्षा अधिक नुकसान मागील वर्षीच्या पुरात झाले होते. तशीच परिस्थिती यावर्षी देखील हळूहळू जोर धरत आहे.

वर्धा नदीच्या अगदी पात्राजवळ वेकोलिने मोठमोठे ढिगारे उभे केले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नदीपात्रातील पाणी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पसरते. चंद्रपूर, भद्रावती व वरोरा तालुक्यातील एकोना, माजरी, चारगाव, ढोरवासा, तेलवासा, उकनी, पिंपळगाव, बेलसनी आणि घुग्गुस जवळ नदीपात्रालगतच मोठे मोठे ढिगारे उभे करण्यात आल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी या ढिगाऱ्याना अडून भद्रावती तालुक्यातील पिपरी (देश), कोची, घोनाड, बेलसनी, चारगाव, कोंढा, पळसगाव, राळेगाव, मनगाव, थोराना, नागलोन, माजरी तथा वरोरा तालुक्यातील शेंबळ, करंजी, एकोना, मार्डा, सोईट, टेमुर्डा, खांबाडा आणि जिल्ह्यातील बऱ्याच गावात पुराचे पाणी शिरते. या परिसरातील वृद्ध व्यक्तींच्या मते, त्यांनी पूर्वीच्या काळी एव्हढा मोठा पूर व पुरामुळे झालेले इतके मोठं नुकसान केव्हाच बघितले नव्हते.

मागील वर्षीच्या महापुराचे महाकाय कृत्रिम संकट बघूनही वेकोली न थांबता अगदी नदीपात्राजवळ पिंपळगाव, उकणी आणि जूनाळा येथे मातीचे ढिगारे उभे केले.

वेकोलिमुळे गावामध्ये पुराचे पाणी शिरत असल्यामुळे या कृत्रिम पूरग्रस्त गावाचे पुनर्वसन वेकोलिद्वारे करण्यात यावे.

मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील नदीलगत असलेल्या गावाबद्दल अजूनही काहीच ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आता या वर्षी देखील पावसाळा सुरू होताच भद्रावती तालुक्यातील पिपरी (देश) हे गाव पूर्णतः पुराच्या वेढ्यात आले आहे. गेल्या पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे संपूर्ण गावातील शेती आणि काही घरे पाण्याखाली आली होती. यास सर्वस्वी जबाबदार वेकोली आहे. यावर्षी देखील हीच परिस्थिती आहे.

पिपरी (देश) गावातील प्रतिनिधी आणि नागरिकांनी ऊर्जाग्राम, कुचना आणि भालर येथील वेकोली मुख्यप्रबंधक यांची भेट घेऊन निवेदन सुद्धा दिले होते. मात्र आमच्या वेकोली ढीगाऱ्यांमुळे पूर आलाच नाही असं उत्तर वेकोली अधिकारी देतात. काही अधिकारी पाठवून तुमच्या गावातील कामे सांगा आम्ही सीएसआरमार्फत काम करून देऊ असे सांगून मोकळे होतात. पण प्रत्यक्षात कोणतीच ठोस उपाययोजना करीत नाही.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पुरपिढीत गावाची पाहणी करून अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले होते, मात्र महिने लोटून सुद्धा काही कार्यवाही झाली नाही.

वर्तमान पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन देऊन मात्र पुरपिढीतांच्या पदरात आश्वासन पलीकडे काहीच पडत नाही.

मोठमोठ्या बाता करणारे लोकप्रतिनिधी या गंभीर सनस्येबाबत मूग गिळून बसले आहेत.

आणखी वेकोलीचे ढिगारे उभे करणे सुरू करण्यात आले असून वेकोली जनतेच्या जीवावर उठली काय? सरकार आणि लोकप्रतिनिधी याकडे जाणूनबुजून तर दुर्लक्ष करत नाही ना? असे प्रश्न गावकरी विचारत आहे.

BOX

या सर्व समस्येला घेवून स्थानिक सामाजिक तथा राजकीय कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांचे नेतृत्वात वेकोलीमुळे उद्भवणाऱ्या पुरबाधित गावकऱ्यांच्या वतीने वेकोली प्रशासना विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या समस्येविरोधात स्थानिक पातळीवर तथा न्यायालयीन लढा सुरू आहे, हे विशेष.

वेकोली बाधित पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पीक कर्जाची उचल केल्या प्रमाणात सरसकट एकरी व त्यावर अनुदान अशा स्वरूपात तात्काळ खनिज निधीतून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अन्यथा वेकोलीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बसने मुश्किल करू, असा इशारा रविंद्र शिंदे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...