वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा :-चंद्रपूर जिल्ह्यात २१ ते २४ जुलै दरम्यान झालेली अतिवृष्टी व पुरामुळे १२ हजार ८४१ हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून पुढे आले असून अंतिम अहवालात नुकसानीचे क्षेत्र पुन्हा वाढणार असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत २२ हजार ८३५ शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. खरीपाचा हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणीयोग्य पाऊस आल्याने खरीपाच्या सुरुवातीलाच अनेक शेतकऱ्यांनी धान, तुर, कापूस, सोयाबीन व अन्य कडधान्याची पेरणी केली, पीके जोमाने वाढीस लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दरम्यान, २१ जुलैपासून जिल्ह्यात पावसाने झोडपणे सुरू केल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून २१ ते २४ जुलै या कालावधीतील अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्धा, वैनगंगा व इरई नदीला पूर आल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झालेले आहे.
चंद्रपूर जिल्हयातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, बल्लारपूर, पॉम्भूर्णा सावली, ब्रम्हपूरी, सिंदेवाही या तालुक्यात खरीप पिकाची सर्वाधिक हानी झाल्याने अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदत मिळणे आवश्यक आहे. पाऊस व अतिवृष्टीने जिल्ह्यातील ३८९ गावे बाधित झाली असून रस्त्यांचे, घरांचे आणि नागरिकांचे मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आर्थीक परिस्थितीमूळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदत मिळणे आवश्यक आहे. तसेच चंद्रपूर जिल्हयात दिनांक २६ जुलै रोजी शेतात कामे करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून ८ जणांचा मृत्यू झाला असुन १२ ते १५ शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. यासाठी संबंधित यंत्रणेने लक्ष घालून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठीचे निर्देश शासनामार्फत तातडीने दिले जावेत, यासाठी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत आमदार सुभाष धोटे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. तसेच या संदर्भात आ. धोटे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना देखील निवेदन देऊन राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील शेतपिकांचे सरसकट सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...