आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रिपोर्टर : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
मो. ७७५६९६३५१३.
भद्रावती : तालुक्यातील घोडपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून परिसरातील २४ गावांतील सर्वसामान्य नागरिक उपचार घेतात. घोडपेठ व उपकेंद्रातील या २४ गावांतील नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेले आरोग्य केंद्रच सध्या 'ऑक्सिजनवर' असुन आरोग्य केंद्राची ईमारत कोणत्याही क्षणी रूग्णांच्या अंगावर पडून मोठा अपघात होवू शकतो. ईमारत दुरूस्ती करिता मागील २ वर्षांपासून सतत आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र आरोग्य विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने रूग्णांना धोकादायक ईमारतीत उपचार घ्यावा लागत आहे.
घोडपेठ आरोग्य केंद्रा अंतर्गत घोडपेठ, चालबर्डी, चेकतिरवंजा व घोनाड अशा चार उपकेंद्रांचा समावेश होतो. आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारी काही गावे आरोग्य केंद्रापासून २५ ते ३५ किलोमीटर अंतरावर आहेत. परिसरातील शेतकरी व मध्यमवर्गीय नागरिक येथे उपचारासाठी येतात. मात्र आरोग्य केंद्राची इमारत अतिशय जुनी झाल्यामुळे धोकादायक अवस्थेत आली आहे. पावसामुळे संपूर्ण इमारत गळत असून इमारतीचे स्लॅबचे प्लास्टर निघालेले आहे. प्लाटर सतत पडत असून रूग्णाच्या अंगावर पडून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चार महिन्यांअगोदर रूग्णालयात बसून काम करत असतांना येथील आरोग्य सहाय्यक (स्त्री) यांच्या अंगावर स्लॅबचे प्लास्टर पडून त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. तसेच परिचर यांना सुद्धा दुखापत झालेली आहे. रुग्णालयात इतर रुग्ण तसेच नवजात बालके सुद्धा उपचारासाठी येतात. मात्र धोकादायक इमारतीत उपचार करण्याशिवाय डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पर्याय नाही. ईमारतीला ३० वर्ष झाले असून ईमारत दुरूस्त करण्यासाठी सतत पत्रव्यवहार करण्यात येत आहे.
घोडपेठ येथील आरोग्य केंद्राला मॉडेल पीएचसी चा दर्जा मिळालेला आहे. ४. उपकेंद्रांअंतर्गत येणाऱ्या २४ गावातील रूग्ण येथे उपचारासाठी येतात. याठिकाणी नॉर्मल प्रसुतीची सुविधा आहे. नागपूर - चंद्रपूर महामार्गावर हे आरोग्य केंद्र असल्यामुळे अपघात झाल्यास जवळचे आरोग्य केंद्र म्हणून येथे तात्काळ प्राथमिक उपचारासाठी आणले जाते. आरोग्य विभागाने दखल घेत घोडपेठ आरोग्य केंद्राची ईमारत दुरूस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.आरोग्य विभाग शासनाकडे दुरुस्ती साठी पाठपुरावा करीत आहे .कर्मचार्या च्या रिक्त जागा आहे. प्रत्येक ठीकानी एक एक नर्स कमी आहे . त्यामुळे या आरोग्य केंद्राचा भार एकच सीस्टर श्रीमती के . ए . चक्र नारायण सांभाळते आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...