आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली: २४ जुलै २०२३
भारत देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होत आहेत. मणिपूर राज्यात जातीय हिंसाचारात अनेक निश्पाप नागरिकांचे बळी गेलेले आहेत. अनेक महिलांचे शोषण करण्यात आलेले आहेत.त्यासोबतच मणिपूर राज्यातील दोन महिलांना निवस्त्र करून ठार मारण्यात आलेले आहे.हि घटना मानव जातीला काळीमा फासणारी आहे.मणिपूर मधिल महिलांवरील अत्याचारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.या देशात महिला सुरक्षित नाहीत हे यावरुन दिसून येत आहे.
मणिपूर राज्यात सध्या जो हिंसाचार सुरु आहे. त्याकडे केंद्र सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे. गेल्या तिन महिन्यापासून मणिपूर अशांत आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष्य देवून परिस्तीती हाताळण्याची आवश्यकता होती मात्र शासन यात पुर्णपणे अपयशी ठरलेली आहे. आणि त्यामुळे सदर गंभीर बाबीकडे आपण जातीने लक्ष्य देण्याची आवश्यकता आहे.
आपली भरतीय संस्कृती महिलांचा सन्मान करणारी संस्कृती आहे. महिलांचे आपण पूजन करतो, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होडकर, झॉसीची रानी यांचा आपण समाजापुढे आदर्श ठेवतो. मुलींना शिकविले पाहिजे असा आपण सर्वत्र विचार मांडतो मात्र सध्याच्या युगात महिला सुरक्षित नाहीत असे मणिपूर येथील घटनेवरुन दिसून येते.ज्या जवानंनी सिमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने आपली बाजू लावली लग जवानांच्या कुटूंबियावर मनिपूर येथील दहशतवादयांनी हल्ला चढविला त्यांच्या कुटूंबियावर विवस्त्र करण्यात आले. हि. अतिशय शरमेची बाब आहे.देश आज गंभीर परिस्थितीतुन जात आहे. मणिपूर येथे नागरीकांचे मुलभूत अधिकार गेल्या तिन महिण्यात ठप्प झाले आहेत. सर्व मुलभूत सेवांवर बंधने लावण्यात आली आहेत. जनजीवन विस्कळीत झालेल आहे. केंद्र शासन व तेथिल राज्य शासन मणिपूर राज्यातील सामाजीक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आपण स्वता जातीने लक्ष्य देवून परीस्थिती हाताळण्याची विनंती आहे.
मणिपूर येथील घटनेचा तसेच किरीट सोमय्या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो भविष्यात महिलांची सुरक्षततेचा प्रश्न सरकारच्या माध्यमातून अधिक चांगल्या पध्दतीने सोडविला जाई अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.असे प्रतिपादन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांनी केले आहे.
तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नग्न अवस्थेत फोटो व व्हिडिओ काढून भारतातील समस्त महिला भगिनींचा अपमान केला, आज अश्या घृणास्पद कृत्यामुळे महिलांचा अपमान झाला.सध्याच्या वातावरणावरुन महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षीतते कडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे..यासाठी सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार मा.पाटील साहेब यांच्या मार्फत भारताचे महामहीम राष्ट्रपती श्रीमती.द्रोपदी मुर्मु यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती मा.दिनेश पाटील चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, महिला तालुकाध्यक्ष सौ.उषाताई भोयर, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यलवार,सावली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मा.किशोर कारडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार, नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,महिला शहराध्यक्षा सौ.भारती चौधरी,माजी उपसभापती प.स. सौ.मंगला चिमड्यालवार,नं.प.सावलीच्या बांधकाम सभापती सौ.साधना वाढई, पाणीपुरवठा सभापती मा.अंतबोध बोरकर,तसेच मा. आकाश येणप्रेडीवर, मा.सुनील बोमणवार, मा.दीपक जवादे, मा.सुनील पाल, मा.पंकज कागदेलवार, मा.चक्रधर दुधे, मा.डोमा शेंडे, मा.संजय मजोके,मा.श्रीकांत बहिरवार,सौ.अंजली दमके, सौ.शिला गुरुनुले,सौ.प्रीती गोहने, सौ.कविता मुत्यालवार आदी काँग्रेसचे पदाधिकारी, नगर पंचायत सावलीचे नगरसेवक व सर्व फ्रंटल ऑरगॅनिझेशनचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...