आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:-२४ जुलै २०२३
ओ.बी.सी. समाजाच्या न्याय मागण्यासाठी सावली तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.सावली तालुक्यात अति वृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली.त्यात अनेक ओ.बी.सी बांधवांचे घरे पडलेली आहेत.त्यांना तात्काळ घरकुल योजना लागू करण्यात यावी अशी मागणी सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार मा.पाटील साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, समाजात आज ओबीसी समाजाच्या अनेक समस्या शासन दरबारीं शिल्लक आहेत, त्या समस्या तातडीने सोडवाव्या अशी मागणी करण्यात आली आहे.शासनाने माजी मंत्री मा.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात ओबीसी समाजासाठी घरकुल योजना अमलात आणून सुरु केली होती. सद्याचा विद्यमान शासनाने ओबीसीसाठी घरकुल योजना सुरु केली,मात्र सदर योजनेची अजून पर्यंत अंमल बजावणी केलेली नाही याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आलेली आहे.
सद्या प्रधानमंत्री आवास योजनेचा माध्यमातून घरकुल लाभार्थींना १ लाख ५० हजार रुपये मिळतात.व सद्याचा महागाईच्या काळात सदर रक्कम ही नगण्य आहे.त्यामुळे घरकुल लाभार्त्याचा रक्कमेत ३००००० लाख रुपयापर्यंत वाढ करण्यात यावी अशी मागणी व ओबीसी समाजाच्या अडचणी शासनाने त्वरित दूर कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा निवेदनातून करण्यात आलेली आहे.
निवेदन देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती मा.दिनेश पाटील चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, महिला तालुकाध्यक्ष सौ.उषाताई भोयर, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यलवार, सावली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मा.किशोर कारडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार, नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,शहराध्यक्षा सौ.भारती चौधरी,माजी उपसभापती प.स. सौ.मंगला चिमड्यालवार,नं.प.सावलीच्या बांधकाम सभापती सौ.साधना वाढई, पाणीपुरवठा सभापती मा.अंतबोध बोरकर,तसेच मा. आकाश येणप्रेडीवर, मा.सुनील बोमणवार, मा.दीपक जवादे, मा.सुनील पाल, मा.पंकज कागदेलवार, मा.चक्रधर दुधे, मा.डोमा शेंडे, मा.संजय मजोके,मा.श्रीकांत बहिरवार,सौ.अंजली दमके, सौ.शिला गुरुनुले,सौ.प्रीती गोहने, सौ.कविता मुत्यालवार आदी काँग्रेसचे पदाधिकारी, नगर पंचायत सावलीचे नगरसेवक व सर्व फ्रंटल ऑरगॅनिझेशनचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...