Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *शिवसेना (उबाठा) आयोजित...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*शिवसेना (उबाठा) आयोजित निशुल्क टेस्ट सिरीजला भद्रावती व वरोरा केंद्रावर विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद* *वरोरा व भद्रावती केन्द्रावर 578 विद्यार्थ्यांनी दिली तलाठी व वनरक्षक सराव परीक्षा* *शिवसेना (उबाठा) व्दारा दर रविवारी तलाठी व वनरक्षक पदाकरीता निशुल्क टेस्ट सिरीजचे आयोजन*

*शिवसेना (उबाठा) आयोजित निशुल्क टेस्ट सिरीजला भद्रावती व वरोरा केंद्रावर विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद*    *वरोरा व भद्रावती केन्द्रावर 578 विद्यार्थ्यांनी दिली तलाठी व वनरक्षक सराव परीक्षा*    *शिवसेना (उबाठा) व्दारा दर रविवारी तलाठी व वनरक्षक पदाकरीता निशुल्क टेस्ट सिरीजचे आयोजन*

*शिवसेना (उबाठा) आयोजित निशुल्क टेस्ट सिरीजला भद्रावती व वरोरा केंद्रावर विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद*

 

*वरोरा व भद्रावती केन्द्रावर 578 विद्यार्थ्यांनी दिली तलाठी व वनरक्षक सराव परीक्षा*

 

शिवसेना (उबाठा) व्दारा दर रविवारी तलाठी व वनरक्षक पदाकरीता निशुल्क टेस्ट सिरीजचे आयोजन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:- हिन्दुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रिद वाक्य 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण याच्याशी सुसंगत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी गावातील गोर गरीब विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत इतर मुलांच्या तुलनेत कमी पडू नये तसेच यांनी पण इतरांसारखे स्पर्धा परीक्षेतच्या प्रवाहात यावे या करीता विधानसभा क्षेत्रात वरोरा व भद्रावती येथे विद्यार्थ्यानकरीता निशुल्क टेस्ट सिरीजचे आयोजन केले. मागील दोन आठवडयापासून ही तलाठी व वनरक्षक पदाकरीता होणाऱ्या शासनाच्या परीक्षेकरीता सराव परीक्षा दर रविवारी सुरु करण्यात आली.

शिवसेना (उबाठा) महिला जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उप-जिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, विधानसभा समन्वयक, युवती सेना अधिकारी प्रतिभा मांडवकर यांच्या नेतृत्वात वरोरा व भद्रावती येथे सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. हि परीक्षा दर रविवारी आयोजीत करण्यात येत आहे.

शिवसेना (ऊबाठा )युवा-युवती सेनेच्या विद्यमाने शासनाव्दारे घेण्यात येत असलेल्या तलाठी व वनरक्षक पदासाठी सुरू असलेल्या निःशुल्क सराव टेस्ट सीरिजचा तिसरा टप्पा  दि. 23 जुलै रोज रविवारला वरोरा येथील कर्मवीर विद्यालय तसेच भद्रावती येथील डॉ. विवेक शिंदे प्रशासकिय महाविद्यालय या केंद्रावर  पार पडला. या दोन्ही केंद्रावर विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला. दोन्ही केंद्रावर परीक्षार्थींनी सराव टेस्ट सिरीजसाठी  गर्दी केला होती.  परीक्षेदरम्यान शिवसेना वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी दोन्ही  परीक्षा केन्द्राला भेट देऊन पाहणी केली.

स्थानिक भद्रावती येथे डॉ. विवेक शिंदे प्रशासकिय महाविद्यालय  येथे  या परीक्षेचे केंद्र ठेवले होते. या केंद्रावर परीक्षक म्हणून प्रा. अश्लेषा जिवतोडे भोयर, शिव गुडमल, स्नेहा बन्सोड, भावना खोब्रागडे, राहुल मालेकर, गौरव नागपूरे आणि महेश निखाडे यांनी जबाबदारी पार पाडली.  याप्रसंगी भद्रावती तालुकाप्रमुख नंदू पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना तालुका प्रमुख राहुल मालेकर, युवासेना सरचिटणीस येशु आरगी आणि माजी नगरसेवक प्रशांत कारेकर यांच्यासह शिवसैनिकांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी  सहकार्य केले.

तसेच वरोरा येथील कर्मवीर विद्यालयातील परीक्षा  केंद्रावर  परीक्षक म्हणून प्रतिभा मांडवकर, प्रा. प्रिती पोहाणे, मंगेश भोयर, प्रुफुल ताजणे, शशिकांत राम, अनिल सिंग, सृजन मांढरे, स्वाती ठेंगणे, तेजेस्वीनी चंदनखेडे, कार्तीक कामडे, सोनल चालेकर, निखिल मांडवकर, कार्तिक कामडे यांनी काम बघीतले. वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, सुधाकर बुरान, देविदास ताजणे, चंद्रकांत जिवतोडे, युवराज इंगळे व शिवसैनिक यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यास सहकार्य केले.

सदर दोन्ही परीक्षा केन्द्रावर 578 विद्यार्थ्यांनी तलाठी व वनरक्षक सराव टेस्ट सिरीज करीता सहभाग नोंदविला. मागील दोन आठवडयापासून सराव परीक्षेकरीता विद्यार्थ्याचा कल वाढत असून वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगल देण्याचा प्रयत्न करुत असे मत रविंद्र शिंदे यांनी मांडले व तसेच पुढे होणाऱ्या मुख्य स्पर्धा परीक्षेकरीता शुभेच्छा दिल्या तसेच दर रविवारी ह्या परीक्षेचे आयोजन नमूद केन्द्रावर नियमित होईल व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...