युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस:
मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.अशातच चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीच्या धानोरा पुलावरून पाणी वाहत असून धानोरा, गडचांदूर भोयगाव मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गावर घुग्गुस पोलिसांनी बॅरिकेट्स लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून नागरिकांनी व वाहतुकदारांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांनी केले आहे.
वर्धा नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दरवर्षी प्रमाणे धानोरा पूल पाण्याखाली गेला आहे.तर वर्धा नदीलगत असलेली शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर धानोरा गावाचा चंद्रपूर मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.गडचांदर भोयगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून घुग्गुस पोलिसांनी या मार्गावर बॅरिकेट्स लावले आहे. त्यामुळं या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.तर वर्धा नदीच्या पुलावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...