Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *ग्रा.पं.रामपूर, राजुरा...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*ग्रा.पं.रामपूर, राजुरा नगर परीषदेमध्ये समाविष्ट करण्यासाठी; पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार* *माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी घेतली शिष्टमंडळासह मुख्यमंत्री ना.शिंदे यांची भेट*

*ग्रा.पं.रामपूर, राजुरा नगर परीषदेमध्ये समाविष्ट  करण्यासाठी; पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार*                         *माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी घेतली शिष्टमंडळासह मुख्यमंत्री ना.शिंदे यांची भेट*

*ग्रा.पं.रामपूर, राजुरा नगर परीषदेमध्ये समाविष्ट  करण्यासाठी; पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार*            

         

माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी घेतली शिष्टमंडळासह मुख्यमंत्री ना.शिंदे यांची भेट

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-शहरालगत असलेल्या रामपूर ग्रामपंचायतला राजुरा नगर परीषदेमध्ये समाविष्ट करण्यासंबंधी विविध संघटना, नागरीक व ग्राम पंचायतीने केलेल्या मागणीनुसार माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात जिल्हाचे पालकमंत्री ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मुंबई येथे दि .१९.०७.२०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट शिष्टमंडळासोबत करुण दिली.  झालेल्या या भेटीत रामपूर गाव राजुरा नगर परीषदेमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाला सुचना करणार असल्याचे सांगितले यावेळी राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई उपस्थित होते.

लोकसंख्येच्या दृष्टीने व भौगोलीक क्षेत्रफळाच्या आकाराने राजुरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या राजुरा शहरालगतच्या वस्तीत ६५ अकृषक ले-आऊट आहे. पुर्वी या ले-आऊट मध्ये नागरी सोई सुविधा न केल्यामुळे आज गावात अनेक समस्येचा डोंगर ऊभा आहे. गावात सांडपाणी वाहुन नेण्यासाठी नाली, रस्ता, वीज, यासह अन्य समस्यांना नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामपंचायतच्या अल्प निधीमधून विस्तारलेल्या वस्तीचा विकास करणे शक्य नसल्याने ग्रामपंचायत राजुरा नगर परीषदेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी ग्रामपंचायतीने व नागरीकांनी रामपूर ग्रामपंचायतीचे शिल्पकार माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्याकडे ५ मे रोजी ग्राम पंचायत स्थापना दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात केली. त्यानुसार माजी आमदार निमकर यांनी रामपूर ग्रामपंचायत नगर परीषदमध्ये समाविष्ट करण्याची मागणी मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केली असता सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी या मागणीला दुजोरा देत रामपूर गाव राजुरा नगर परीषदेमध्ये समाविष्ट करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.

माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेत निवेदन देऊन चर्चा केली असता यासंबंधी आपण तात्काळ कार्यवाही करण्यासंबंधी सुचना देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभा लावली असता नागरीकांनी प्रचंड प्रतिसाद देत सभेला उपस्थित शेकडो नागरिकांनी एकमताने ठराव मंजूर केला. वेकोली परीसरात असलेल्या या गावात मोठ्याप्रमाणात वेकोलीचे कर्मचारी व मजूर राहत असून रामपूर वस्तीत राजुरा शहराची आराद्य दैवत असलेल्या भवानी मातेचे मंदीर, बाजार समिती, शहराला पाणी पुरवठा करणारे जलशुध्दीकरण केंद्र असून दरवर्षी राजुरा शहरातील नागरीक दसऱ्याचा उत्सव हजारो नागरीकांच्या उपस्थितीत रामपूर परीसरात केल्या जात आहे. यामुळे बारा ते पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या वस्तीचा विकास ग्रामपंचायत विकास निधीमधून करणे शक्य नसल्याने राजुरा नगर परीषदेला जोडल्यास रामपूर गावाचा विकास करणे सहज शक्य होणार असल्याने रामपूर ग्रामपंचायत परीषदेला जोडण्याची मागणी नागरीकांनी केली. त्यानुसार पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी यापुर्वी झालेल्या भेटीत माजी आमदार निमकर यांना रामपूरचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याच्या भेटीला घेऊन येण्याचे सांगितले होते.

त्यानुसार माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात रामपूरच्या सरपंच वंदना गौरकार, पोवणी च्या माजी सरपंच सौ.मंगला सोनेकर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गुलाब दुबे, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव गौरकार, मारोती कायळींगे, श्रीकृष्ण गोरे, प्रदीप बोबडे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवनात भेट घेऊन रामपूर ग्राम पंचायत राजुरा नगर परीषदेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली असता नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाही करण्याच्या सूचना दिल्या.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...