संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर तालुक्यातील अतिप्रदूषित शहर म्हणून घुग्घुसची ओळख आहे.प्रदूषणामुळे नागरिकांचे जगणे कठीण होत चालले असून नागरिकांच्या सोयीसुविधासाठी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले.मात्र आता शासनाने निधी अडविला असून कंत्राटदाराने रुग्णालयाचे बांधकाम बंद केले आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन निधीची मागणी केली होती.त्यांच्या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत.त्यामुळं लवकरच घुग्घुसच्या ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू होणार आहे.
घुग्घुस शहरात मोठमोठे कारखाने असून मोठ्या प्रमाणात येथे प्रदूषण होत आहे.अशातच 9 जून 2014 ला घुग्घुस शहरात ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले.2 डिसेंबर 2021 ला प्रत्यक्षात बांधकाम सुरू करण्यात आले.मात्र शासनाने कंत्राटदाराचे बिल थकविले व निधी अभावी रुग्णालयाचे बांधकाम रखडले आहे.त्यामुळे कंत्राटदाराचे बिल मंजूर करून रखडलेला निधी शासनाने तात्काळ द्यावा व रुग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीक्की यांनी केली होती.तसे पत्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविले होते.त्यानंतर मुनगंटीवार यांनी पत्राची गांभीर्याने दखल घेऊन लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे तसे पत्र ईबादुल सिद्धीकी यांना पाठवले आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...