Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *मातंग समाजाच्या मागण्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*मातंग समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आ. सुभाष धोटेंची लक्षवेधी* *आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी भेट घेऊन केले आश्वस्त*

*मातंग समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आ. सुभाष धोटेंची लक्षवेधी*    *आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी भेट घेऊन केले आश्वस्त*

*मातंग समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आ. सुभाष धोटेंची लक्षवेधी*

 

*आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी भेट घेऊन केले आश्वस्त*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:--  मागासवर्गीय मातंग समाज व तत्सम ५० जातींनी वेळोवेळी विविध आंदोलनांच्या लेखी निवेदनांच्या माध्यमातून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या मांगण्याकडे होत असलेले दुर्लक्ष व टाळाटाळ यामुळे या घटकांचा शासनाप्रति तीव्र असंतोष व संतापाची भावना असून समाज बांधवांनी मुंबई येथे आझाद मैदानावर निषेध आंदोलन केले. या आंदोलनस्थळी  लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन आपल्या क्षेत्रातील मातंग समाज बांधवांशी संवाद साधला. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनाचा स्विकार करून यासंदर्भात लक्षवेधी सूचना दाखल करून राज्य सरकारला याबाबत निर्णय घेण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले. व लगेच तशी लक्षवेधी सूचना दाखल केली.

          याबाबत सविस्तर वृत्त असे की, अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करता येते आणि तसे अधिकार राज्य सरकारला आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने २२ एप्रिल २०२० रोजी चेद्रालु लिलाप्रसाद राव विरुद्ध आंध्रप्रदेश आणि २७ ऑगस्ट २०२० रोजी देवींदरसिंग विरुद्ध पंजाब या केसमध्ये व्यक्त केले. त्या आधारे कर्नाटक सरकारने दि २७/०३/२०२३ रोजी तशा प्रकारचे आदेश पारित केले. त्याच धर्तीवर राज्यातील मागासवर्गीय मातंग व तत्सम ५८ जाती संदर्भात अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याबाबत शासनाने प्रस्तावित केलेल्या अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करावे असे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली दि २५ /०३/२०२३ रोजी समिती कक्ष, विधानभवन, मुंबई येथे चर्चा झाली. सदरहू बैठकीत कर्नाटक सरकारने अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती मागविण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर सदर बैठकीत अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था "आर्टी" स्थापन करण्याबाबतही चर्चा झाली मात्र अजूनही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे समाज बांधवांमध्ये सरकार च्या भुमिकेबद्दल रोष आहे.

           या प्रसंगी आंदोलनस्थळी आ. सुभाष धोटे यांना निवेदन देताना राजुरा क्षेत्रातील डॉ. अंकुश गोतावळे, दत्ता गायकवाड, प्रा सुग्रीव गोतावळे, भानुदास जाधव,  आनंद भालेराव, विजयकुमार कांबळे, जयंत गोतावळे, जयंत गोतावळे, बालाजी कांबळे, दयानंद आकृपे, चंपत गवाले, नितीन तलवारे, संग्राम नामवाड यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...