Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *शिवसेना (उध्दव बाळासाहेब...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात इनकमिंग सुरूच* *शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश*

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात इनकमिंग सुरूच*    *शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश*

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात इनकमिंग सुरूच*

 

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकारणाचा जनतेला विट आलेला आहे. सत्तेसाठी निष्ठा गहाण ठेवून राजकीय मंडळी वागत आहेत. जनतेच्या प्रश्नावर कुणाचेच लक्ष नाही. सत्तेत राहून मलिंदा लाटायचा व वाम मार्गाने कमावलेली संपत्ती सुरक्षित करायची, असा गोरखधंदा राजकारणी करीत आहेत. राज्यातील वातावरण गढूळ होत असताना मात्र शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपली निष्ठा व प्रामाणिकता कायम ठेवली आहे. पक्षांतर्गत व इतर पक्षाचे नेते भ्रष्ट राजकारणाचा भाग होत असताना उध्दव ठाकरे यांनी मात्र हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासून पक्षाचा सन्मान, आपला आब, व सोज्वळ राजकारणाचा आदर्श कायम ठेवला आहे. ८०% समाजकारण व २०% राजकारण हे ब्रीद जोपासत त्यांची कार्यशैली सुरू आहे. याच नितीला चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्याचे काम शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे सामाजिक कार्याला प्राथमिकता देवून करीत आहे.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने वरोरा व भद्रावती तालुक्यातील कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत.

वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तथा चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी संघटीका नर्मदा बोरेकर यांच्या मार्गदर्शनात भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, तालुका संघटीका आश्लेषा जिवतोडे-भोयर, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, भावना खोब्रागडे यांच्या नेतृत्वात काल (दि.१९) ला महेश पेटकर, प्रतिश मेश्राम, हितेश मेश्राम, प्रदिप वाडके, प्रफुल रायपुरे,  महिलामध्ये रेखा पेटकर, प्रेमिला सिवनितवार, पोटकन्नी वेंकटरमण यांनी शिवबंध बांधीत पक्षप्रवेश केला.

याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख माया नारळे, उप-तालुका संघटीका शिला आगलावे, उप-शहर प्रमुख शिला चामाटे, सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे व शिवसैनिक पुरुष-महीला उपस्थित होते.

शिवसेनेत येणाऱ्या सर्व शिवसैनिकांनी जनसेवा हीच ईश्वरसेवा या उक्ती प्रमाणे कार्यरत असावे असे रविंद्र शिंदे म्हणाले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...