वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
आमदार सुभाष धोटेंची राज्य सरकारकडे मागणी
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा :- राज्यात सथ्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघात येणाऱ्या करंजी या गावातील दोन तलाव फुटल्यामुळे गावातील नागरिकांचे हाल बेहाल सुरू आहेत, अतोनात नुकसान होत आहे, परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याआधी राज्य सरकारने विशेष लक्ष घालून येथील पूर परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी व नुकसानग्रस्तांना योग्य मदत करण्यासाठी, आवश्यक नियोजन करावे अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातील आजच्या कामकाजात केली. यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आस्वस्थ केले की यासंदर्भात योग्य नियोजन करून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येईल.
चंद्रपूर जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्हात अनेक ठिकाणी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात पावसाच्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील करंजी येथे मुसळधार पावस व अतिवृष्टी झाल्याने दोन मुख्य तलाव फुटले त्यामुळे येथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक झालेली आहे सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून राज्य शासनाने थेट लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला तसेच सर्व आवश्यक यंत्रणांना विशेष सूचना देऊन येथील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...