आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रिपोर्टर : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
मो. ७७५६९६३५१३,८४५९०४५१५८.
भद्रावती ; माननीय मुख्यमंत्री तथा नेते एकनाथ शिंदे साहेब यांचे आदेशाने माननीय संजय जी मोरे साहेब शिवसेना सचिव, खासदार श्री प्रतापराव जाधव शिवसेना नेते यांचे मुख्य उपस्थितीत श्री किरण भाऊ पांडव यांचे सूचनेनुसार व श्री बंडूभाऊ हजारे सह संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा, श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख व सौ योगिताताई लांडगे महिला आघाडी जिल्हाप्रमुख, श्री सूर्या अडबाले युवासेना जिल्हाप्रमुख यांचे विनंतीवरून सूर्याच्या विधानसभा क्षेत्र उपजिल्हाप्रमुख पदी श्री डॉक्टर सागर माकोडे, भद्रावती शिवसेना तालुका प्रमुख पदी श्री कमलकांत कळसकर, तर श्री राजेश डांगे यांची वरोरा शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली .डॉक्टर सागर माकोडे यांचा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रा मध्ये दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या जनसंपर्काचा फायदा शिवसेनेला विधानसभा क्षेत्रामध्ये पक्ष वाढी संदर्भात निश्चितच होईल तसेच श्री कमलकांत कळस्कर हे ग्रामपंचायतचे माजी सदस्य असून शिवसेनेचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत . त्यांचा भद्रावती तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या माध्यमातून भद्रावती तालुका व शहर मध्ये पक्ष वाढ करण्यास विशेष मदत होईल . त्याच प्रमाणे श्री राजेश डांगे हे वरोरा शहरातील केबल नेटवर्क व्यवसायीक असून तथा शिवसैनिक असून ते सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असून वरोरा शहरांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असून आज राजेश डांगे हे नाव वरोरा शहरात सुपरीचीत आहे त्यांची सुद्धा शिवसेना वाढीसाठी विशेष मदत होईल असा विश्वास श्री नितीन मते जिल्हाप्रमुख यांनी व्यक्त केली . कमलकांत कळस्कर आणि राजेश डांगे यांच्या नियुक्तीने वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसैनिकां मध्ये नव चैतन्य निर्माण झालेले दिसून येत आहे .
यावेळी श्री सूर्या अडबाले युवासेना जिल्हाप्रमुख, श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा शहर प्रमुख भद्रावती, श्री श्रीकांत खंगार तालुका प्रमुख वरोरा, श्री नरेन्द्र नरड तालूका प्रमुख ब्रम्हपूरी, श्री अमोल माकोडे शहर प्रमुख ब्रम्हपूरी, सौ ज्योती ताई लांडगे महीला आघाडी तालुका प्रमुख भद्रावती हे उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...