आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रिपोरटर : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
मो. ७७५६९६३५१२,८४५९०४५१५८
भद्रावती : चंद्रपूरच्या भद्रावती येथील आयुध निर्माणीच्या वाटचालीत आजचा दिवस अभूतपूर्व यशाचा होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये कंपनीत परिवर्तन झाल्यानंतर निर्माणीमध्ये तयार झालेली पहिली परदेशी निर्यात खेप आज रवाना झाली. बल्गेरिया देशासाठी एक हजार कोटींच्या ऑर्डर पैकी ८० कोटीची पहिली खेप चंद्रपूर आयुध निर्माणीने रवाना केली. बोफोर्स व अन्य तोफांसाठी लागणारे १५५ एमएम तोफगोळे या खेपेतून समारंभपूर्वक रवाना करण्यात आले. ही आयुध निर्माणी पुणे- खडकी येथील म्युनिशन्स इंडिया लिमिटेड या कंपनीत परिवर्तित झाल्यानंतर प्रकल्पाने उत्पादनाचे नवे कीर्तिमान स्थापित केले आहेत.
त्यातच आता पहिला परदेशी ऑर्डर रवाना होण्यास सुरूवात झाल्याने चंद्रपूर आयुध निर्माणीच्या यशात मानाचा तुरा खोवला गेलाय. म्युनिशन्स इंडिया लिमिटेड ही भारतातील दारुगोळा तयार करणारी सर्वात मोठी कंपनी असून भारतीय सैन्यदल आणि परदेशात देखील विविध शस्त्रांसाठीचा दारुगोळा ही कंपनी तयार करते.
चंद्रपूर आयुध निर्माणीत गायडेड पिनाका रॉकेट, पिनाका एडीएम टाईप १ रॉकेट, १५५ MM स्मार्ट अम्युनिशन यांची निर्मिती करण्यात येते. चंद्रपूर आयुध निर्माणीला देश-विदेशातून शेकडो ऑर्डर्स प्राप्त झाल्या असून त्या वेळेत पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...