आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
दोन दिवसांनंतरही अत्यंसंस्कार करण्यास नातेवाईकांसह गावकऱ्यांचा नकार.
रीपोरटर : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर.
मो. ७७५६९६३५१२,८४५९०४६१५८.
भद्रावती : तालुक्यातील बेलगांव येथील स्वप्नील रासेकर वय 26 वर्ष यांची त्यांचे मालक विनोद ठेंगने यांच्या शेतात शनिवार ला रात्री च्या वेळी हत्त्या झाली की त्याचा करंट लागून मृत्यु झाला याबद्दल संशय कायम असून मृतक च्या बहिनीने दिलेल्या प्रतिक्रियेत माझ्या भावाची हत्त्या झाल्याचा धक्कादायक खुलासा केल्याने अख्खा गाव हादरला आहे. दरम्यान माझ्या भावाला घरून बोलावून नेले व शेतात त्याचा मृत्यु झाला पण त्याला घरी आणताना व माझ्या भावाचे घर हे त्याचे मालक विनोद ठेंगने यांच्या घराजवळ असतांना माझ्या आईला सूचना का दिली नाही व परस्पर रुग्णालयात कां नेण्यात आले ? असा प्रश्न उपस्थित केल्याने स्वप्नील ची हत्त्याच झाली असावी असा संशय व्यक्त होतं आहे. महत्वाची बाब म्हणजे या गंभीर प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
स्वप्नील रासेकर हा मागील चार वर्षांपासून विनोद ठेंगने यांच्या शेतात काम करायचा व अगदी प्रामाणिकपणे त्याचे व्यवहार होते. शनिवारला रात्री च्या वेळी अचानकपणे विनोद ठेंगने यांनी त्याला बोलावून शेतात नेले व त्यानंतर तो मरण पावला असल्याची वार्ता गावात पसरली विशेष म्हणजे स्वप्नील ला घरी दुचाकीने घरी आणताना त्याच्या परिवाराला कुठलीही सूचना दिली नाही त्यामुळं त्याची हत्त्या केली असावी व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून प्रकरण रफादफा करण्याचा मनसुबा विनोद ठेंगने यांचा असावा अशी शंका निर्माण झाली आहे. या संदर्भात काल भद्रावती च्या सरकारी रुग्णालयात आई व बहीण यांच्यासह गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करून जोपर्यंत आरोपी विरोधात गुन्हा दाखल होतं नाही व मृतकाच्या नातेवाईक यांना नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा हट्ट केल्याने काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.
*साहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी दिली मृतक स्वप्नील च्या घरी भेट.*
भद्रावती पोलिसांनी आम्हांला न्याय दिला नाही, आम्हांला अंधारात ठेऊन स्वप्नील चे परस्पर पोस्टमॉर्टेम करण्यात आले. त्यामुळं जोपर्यंत आरोपी विनोद ठेंगने यांच्यावर गुन्हा दाखल होतं नाही व स्वप्नीलच्या नातेवाईक यांना नुकसानभरपाई मिळत नाही. तोपर्यंत आम्ही बॉडीचे अंत्यसंस्कार करणार नाही असा इशारा काल गावकऱ्यांनी दिल्यानंतर या क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी व साहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी मृतक स्वप्नीलच्या घरी भेट देऊन आई व बहीणीचे सांत्वन केले. व न्याय नक्कीच मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा अशी ग्वाही दिली. परंतु जोपर्यंत आरोपी विरोधात गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत बॉडी चे अत्यंसंस्कार करणार नसल्याच्या निर्णयावर गांवकरी ठाम असल्याचे बोलल्या जातं आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...