आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
तक्रार उपमुख्यमंत्री कडे दाखल
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:- कोरपना तालुक्यातीलगोविंदपुर व रायपूर तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर चे आदिवासी शेतकरी, शासनाकडून न्याय हक्क मिळवण्यासाठी दि.16/07/2023 ला देवगिरी येथे उपमुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले. ह्या आदिवासी शेतकरी ,वर्ष 1948 चे पुर्वी पासून निझाम जमीनदार चे गोविंद पुर शेतशिवार मधील सर्वे नं 103,तानबा बालाजी कोटनाके, सर्वे नं 91 रामा जंगा सिडाम,85/2 सदाशिव खाडे शेती, खंड देऊन कसत होते.व आताही ह्या आदिवासी शेतकरी चे हया जमीन वर ताबा व कास्त आहे. भारत व पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर निझाम जमीनदार हैदराबाद व आदिलाबाद तेलंगणा वास्तव्यास क्षेत्रात निघून गेले होते. ह्या जमिनी ह्या शेतकरी अंदाजे 75 वर्षांपासून कसत आहेत, तहसील कार्यालय कोरपना कडून, निझाम जमीनदार ना नोटीस बजावले असता,ते गैर हजर असल्याने, प्रशासनाने , वर्ष 1985 ला,सर्वे नं 91 ला रामा जंगा सिडाम नावाने कुळ कायदा लागू केला, तसेच सर्वे नं 103,तानबा बालाजी कोटनाके, ला कुळ कायदा लागू झाला आहे, तसेच 85/2 निझाम जमीनदार ने सदाशिव खाडे ना जमीन विक्री करून दिली होती. ह्या अनुषंगाने ह्या सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून सातबारा नोंद होऊन दरवर्षी पिक कर्ज सुद्धा घेत होते,असे असताना, वर्ष 2009 मध्ये मुकूटबन Rccpl सिमेंट कंपनीचे हालचाली सुरू झाल्या,ही बातमी कळताच निझाम जमीनदार वारीसदारानी, ह्या जमिनी नावाने नोंद करण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हा,वर्ष 2014 मध्ये, तत्कालीन उपविभागीय आयुक्त, राजुरा ह्यांनी ह्या आदिवासी शेतकरी चे कुळ कायदा अंतर्गत मिळाले ले शेतजमीन, मागिल 75 वर्षांपासून कसत असताना,ते रद्द करून निझाम जमीनदार वारीसनावाने नोंद केली आहे, ह्या आदिवासी शेतकरी ना कोणत्या ही प्रकारची पुर्व सुचना न देता सातबारा उतारा वरुन बेदखल करण्यात आले आहे. ह्या जमिनी, निझाम जमीनदार वारसदार नावाने नोंद होताच , सर्वे नं 103 सिमेंट कंपनी दलाल ना विक्री करून दिली व सर्वे नं 91 व 85/2 ही जमीन हाजी अली नामक रियल इस्टेट एजंट ला विक्री करून दिली आहे, ह्या निझाम जमीनदार वारसदारानी ह्या शेती चे व्यापार करून ठेवले आहे व 75 वर्षांपासून ह्या शेती वर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारे आदिवासी शेतकरी ना शेती मधून बेदखल केले आहे.असे राजुरा क्षेत्रातील अंदाजे 49 शेती पट्टे ,300 एकर जमीन,तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजूरा ह्यांनी ह्या जमिनी निझाम जमीनदार वारीसदार नावानं नोंद करून, आदिवासी शेतकरी वर अन्याय केला आहे. ह्या शेती चा निझाम जमीनदार ने सिमेंट कंपनी दलाल, रिअल इस्टेट एजंट ला विक्री करून देऊन व्यापार केला आहे,ह्या विषयावर न्याय मिळवून घेण्यासाठी आदिवासी शेतकरी ने जिल्हा प्रशासन समोर अनेक आंदोलने केली आहे व निवेदन दिले आहे परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही जिल्हा प्रशासन अधिकारी करताना दिसत नाहीत, म्हणून ह्या आदिवासी शेतकरी ने देवगिरी उपमुख्यमंत्री कार्यालयात, उपमुख्यमंत्री साहेबांना, निवेदन देऊन न्याय मिळवून देण्यासाठी मागणी केली आहे.व स्थानिक प्रशासन अधिकारी वर कारवाई ची मागणी केली आहे.हयावेळी मा. धनराज पून्नम कोवे सहसंयोजक जनजाती सुरक्षा मंच चंद्रपूर तथा जिल्हाध्यक्ष भाजप आदिवासी आघाडी महानगर चंद्रपूर,मा. अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता एवंम आदिवासी शेतकरी सोमाजी सिडाम, यशवंत सिडाम, नितेश कोटनाके, रामचंद्र सिडाम, मारोती सिडाम, मुद्रिका ताई खाडे,राहुल खाडे इ.नी उपमुख्यमंत्री कार्यालयात निवेदन दिले आहे.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...