Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *रुग्ण सेवेतील कंत्राटी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*रुग्ण सेवेतील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन तातडीने करा* *आमदार सुभाष धोटेंच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सुचना*

*रुग्ण सेवेतील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन तातडीने करा*    *आमदार सुभाष धोटेंच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सुचना*

*रुग्ण सेवेतील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन तातडीने करा*

 

आमदार सुभाष धोटेंच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सुचना

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-राजुरा उपजिल्हा रुग्णालय तसेच राज्यातील अनेक ठिकाणी रुग्णांना सेवा पुरविणे यासाठी तात्पुरत्या स्वरुपात अल्प कालावधीकरिता कुशल व अकुशल कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करून रुग्ण सेवा देण्याचे काम सुरु आहे. मात्र गेली ३ ते ४ महिन्यापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार, मानधन न मिळाल्याने रुग्ण सेवेचे महत्त्वाचे काम करणाऱ्या या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सदर गंभीर समस्या घेऊन अनेक कंत्राटी कामगार आ. सुभाष धोटे यांना भेटून पगाराबाबतची परिस्थिती निवेदनाद्वारे लक्षात आणून दिली. सदर समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. सुभाष धोटे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोले यांना फोन करून तातडीने कंत्राटी कामगारांचे वेतन करावे अशा सूचना दिल्या.

       उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे तात्पुरत्या स्वरुपात अल्प कालावधीकरिता कुशल व अकुशल कंत्राटी पदाकरिता मनुष्यबळ पुरवठा करण्याचे काम Accuree services Priv-limited Aurangabad या संस्थेकडे असून संस्थेने राजुरा उपजिल्हा रुग्णालय येथे अधिपरिचारिका, क्ष - किरण तंत्रज्ञ , प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी , बाह्य रुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, शस्त्र क्रिया गृह परिचर, व्रनोपचाराक, कक्षसेवक हि पडे पुरवठा केलेली आहेत. मागील सहा महिन्यापासुन कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. माहे एप्रिल ते जून २०२३ या 'कालावधीतील वेतन प्रलंबित असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही कर्मचारी घरचे कुटुंब प्रमुख असल्याने मुलांच्या शैक्षणिक कामाकरिता  व इतर आर्थिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे प्रलंबित वेतन सर्वांना अदा करून येणाऱ्या काळात सर्व कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळण्याची व्यवस्था करावी अशा सुचना आ. धोटे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना केल्या आहेत.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...