Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घुस-वणी मार्गावरील...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घुस-वणी मार्गावरील अपघातग्रस्त वळणाच्या रस्त्याची सफाई

घुग्घुस-वणी मार्गावरील अपघातग्रस्त वळणाच्या रस्त्याची सफाई

काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष सुनील सिल्का यांचा पुढाकार

 

 

घुग्घुस-वणी मार्गावरील बेलोरा नदीच्या पूला जवळील अपघातग्रस्त वळणाच्या रस्त्याची सफाई करण्यात आली आहे.

वेकोलि वणी क्षेत्राच्या नायगाव, निलजई, मुंगोली, पैंनगंगा अशा अनेक कोळसा खाणीतून एचआरजी, एसएलपीएल, केएसटीसी, आरकेई, एनटीसी, चड्डा ट्रान्सपोर्ट  कंपनी अशा विविध खाजगी कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपनी द्वारे खाणीतील कोळसा परिवहन करून घुग्घुस येथील जुनी रेल्वे सायडींग व नविन रेल्वे सायडींगवर खाली करण्यात येतो.

दररोज १५० ते २०० ट्रक हायवा कोळसा वाहतूक करतात वाहनावर तिरपाल झाकून नसल्याने वाहनाचा कोळसा रस्त्यावर पडतो. काही कंपनी द्वारे ८ तासात दोन फेऱ्या चालकांनी मारावे अशी अट ठेवण्यात येते. दिवस रात्र कोळश्याची वाहतूक सुरु असल्याने रस्त्यावर कोळसा व भुकटी पडत असते

सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने या मार्गवर चिखल जमा झाले आहे त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहन धारकांचा दररोज अपघात होत आहे.

 

घुग्घुस-वणी मार्गावरील वेकोलिच्या तपासणी नाक्याजवळच्या रस्त्यावर चिखल जमा झाल्याने ये-जा करणाऱ्या दुचाकी व चारचाकी अशा अनेक वाहन चालकांचा अपघात होत असे ही समस्या लक्षात घेत काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाउपाध्यक्ष सुनील सिल्का यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह बेलोरा पूला जवळ गर्दी केली व वेकोलि अधिकाऱ्यांना त्याठिकाणी बोलावून रस्त्याची दररोज सफाई करणे, कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या वतीने वाहतूक सुरळीत होण्यासाठी २४ तास तीन कर्मचारी बेलोरा चेक पोस्ट रस्त्यालगत तैनात करणे अशा विविध समस्या सांगितली त्यांच्या मागणीची दखल घेत वेकोलिचे अनंत ठाकरे यांनी जेसीबी मशीन बोलावून रस्त्याची तत्काळ सफाई केली.

 

या रस्त्यावरचे पथदिवे बंद असल्याने  वाहन धारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरचे पथदिवे सुरु करण्यासाठी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष सुनील सिल्का यांनी मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांच्याशी संपर्क साधून लवकर पथदिवे सुरु करण्याची मागणी केली त्यांनी दोन ते तीन दिवसात या मार्गावरचे पथदिवे सुरु करण्याचे आश्वासन त्यांना दिले.

 

तसेच त्याठिकाणी असलेली एका खाजगी कंपनीच्या वाहनांची पार्किंग हटवून वाहनांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आला.

 

याबाबत कळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.

 

यावेळी राकेश दिंडीगाला, राहुल यदुवंशी, सुरज कन्नूर, लड्डू सिल्का, आशिष गुंडेटी, रोशन माडगूल, करण पानम, राम यादव, अमन मंथनवार, गोलू यादव, रोहित घोरपडे, भर्री चौधरी, पिंटू मंडल उपस्थित होते.

ताज्या बातम्या

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...