वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : राजेश येसेकर भद्रावती/वरोरा प्रतिनिधी.
7756963512,8459045158
भद्रावती / वरोरा : मला दुसऱ्याला वीस हजार रुपये पाठवायचे आहे. तुम्ही तुमचा चार्ज घ्या असे म्हणत त्याने बारकोड दाखविला मोबाईल व्यावसायिकाने बारकोड स्कॅन करून २० हजार रुपये ट्रांसफर केले. पण माझे पैसे गाडीच्या डिकीत राहिले असे म्हटले आणि मोपेड गाडी घेऊन तो फरार झाला. हि घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान आंबेडकर चौक येथे घडली.
वरोरा शहरात आंबेडकर चौकात मेबाईलचे दुकान आहे. येथे सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान ३० वर्षाचा एक युवक आला. त्याने दुकानदाराला दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवायचे आहे. तुमचा जो चार्ज असेल तो देऊ असे म्हटले. दुकानदाराने हजार रुपयाला १० रुपये असे २० हजाराला दोनशे रुपये चार्ज होणार असे सांगितले नंतर त्या युवकाने आपल्या मोबाईल मधिल व्हॉटसअप मधिल बारकोड स्कॅन करण्यासाठी दिला. दुकानदाराने स्कॅन करून विस हजार रुपये ट्रांसफर केले. त्यानंतर त्या युवकाने दुकानदाराला दोनशे रुपये चार्ज दिला. कॅश मोपेड गाडीच्या डिकीत राहिले. आणुन देतो. असे म्हणताच मोपेड गाडी घेऊन पळ काढला. दुकानदार त्याच्या मागे गेला मात्र तो सुसाट गाडी चालवत पळून गेला. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावून असल्याने त्या भामट्याचा चेहरा त्यात कैद झाला आहे. यानंतर मोबाईल दुकानदाराने वरोरा पोलिसांना झालेला प्रकार सांगितले असता तक्रार दाखल केली. असुन त्या भामट्याचा सिसिटीव्ही फुटेज वरोरा पोलिसांना देण्यात आले. असुन पुढील कारवाई वरोरा पोलीस करीत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...