Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *त्या रिक्त पदांवर बेरोजगार...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*त्या रिक्त पदांवर बेरोजगार डी. एड., बी. एड अभियोग्यता धारकांनाच संधी द्या* *आमदार सुभाष धोटेंची राज्य सरकारकडे मागणी*

*त्या रिक्त पदांवर बेरोजगार डी. एड., बी. एड अभियोग्यता धारकांनाच संधी द्या*    *आमदार सुभाष धोटेंची राज्य सरकारकडे मागणी*

*त्या रिक्त पदांवर बेरोजगार डी. एड., बी. एड अभियोग्यता धारकांनाच संधी द्या*

 

आमदार सुभाष धोटेंची राज्य सरकारकडे मागणी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याबाबत काढलेले परिपत्रक रद्द करून त्या पदांवर सुशिक्षित बेरोजगार डी. एड., बी. एड अभियोग्यता धारकांनाच संधी द्यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे तसेच येणाऱ्या अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली आहे.

        गोंडपीपरी येथील हरिश नागापूर, विलास चौधरी, प्रविन बुर्रीवार, हंसराज वाकुडकर, तिरुपती लगोगवार, नितीन चौथाले, विनोद दुर्गे, नयन रामगोनवार, स्वप्नील धुर्वे, दिक्षा निमगडे यासह अनेक शिक्षक अभियोग्यताधारकांनी आ. धोटे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे अभियोग्यताधारकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. त्यानुसार आ. धोटे यांनी यासंदर्भात राज्यशासनाकडे पाठपुरावा केला असून सुशिक्षित बेरोजगार पात्रता धारकांवरील अन्याय दूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन अभियोग्यताधारकांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

  दिनांक ७ जुलै २०२३ रोजीच्या शासनाच्या परिपत्रकात सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष असून त्यांना २० हजार रुपये प्रति महा मानधन देण्यात येणार सोबतच अन्य काही तरतुदी दिलेल्या आहेत. नियोजित शिक्षक भरती उच्च न्यायालयातील रिट याचिकांमुळे लांबल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. यामुळे पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरती मधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत हा उपाय काढण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राज्यात मोठ्या प्रमाणात पात्रताधारक सुशिक्षित बेरोजगार असताना सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करणे चुकीचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने सदर परिपत्रक रद्द करून त्या रिक्त जागांवर सीईटी पात्र असलेल्या उमेदवारांना तसेच पात्रता धारक डी. एड., बी. एड शिक्षकांना संधी द्यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...