वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : राजेश येसेकर भद्रावती तालुका प्रतिनिधी.
7756963512,8459045158.
भद्रावती : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या भद्रावती शाखेतर्फे राष्ट्रीय विद्यार्थी दिवस व ७५ वा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना दिवस येथील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच साजरा करण्यात आला.
यावेळी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व व्याख्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नवीन कार्यकारिणीही यावेळी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भद्रावती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य यश बांगडे, प्रमुख वक्ते अभाविप जिल्हा संघटन मंत्री अमित पटले आणि प्राचार्य सचिन सरपटरवार मंचावर उपस्थित होते. राष्ट्रीय विद्यार्थी दिवसा सोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस असल्याने याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. यावेळी सुधीर वर्मा यांनी विद्यार्थ्यांना कुठल्याही व्यसनांना बळी न पडण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. यश बांगडे यांनी विद्यार्थी असल्या पासून अभाविप चे कार्यकर्ते आहे म्हणून त्यांनी प्रामुख्याने त्यांचे अनेक अनुभव सांगितले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे देशातली नव्हे तर जगातील सर्वात मोठे छात्र संघटन आहे. अभाविप गेल्या ७५ वर्षां पासून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे काम करत आहे ‘ज्ञान-शील-एकता ‘ हे अभाविप चे त्रीसूत्र आहे. अभाविप वेग-वेगळ्या आयामांच्या माध्यमातून देश भरात विद्यार्थ्यांच्या विकासा करिता व विद्यार्थ्यां मध्ये नेतृत्व घडवण्या करिता काम करते असे व्याख्यान व आजचा विद्यार्थी कसा आहे, कसा असला पाहिजे हे वक्ते अमित पटले यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडले.
जिल्हा सह संयोजक बाळा भडगरे यांनी भद्रावती शाखेची नूतन कार्यकारिणी घोषित केली. त्यात नगर अध्यक्ष प्रा. नितीन लांजेवार, नगर मंत्री यश चौधरी, नगर सह मंत्री वैभवी बेहरे, निविदिता मजुमदार, प्रत्यूष पिट्टलवार आणि विविध दायित्वांवर गुलशन आष्टनकर, अनुष्का दैवलकार, हर्षल घुगुल, स्वप्नील बावणे, हिरामन मंडल, रोहित सू. शेट्टी, साहिल नक्षिणे, रोहित ग. शेट्टी, पवान चौखे, पायल सागुळले, आचल खुळसाने, साक्षी मशाखत्री,मयुरी रामटेके, सानिया चांडणखेदे, पल्लवी जिल्लेवार, सेजल मरसकोल्हे, किर्ती उराडे, तनवी मंथनवार, नागेश मोहरले, सद्गुरू नागपूरे, नाविन्य नागपुरे यांची घोषणा करण्यात आली.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...