वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : राजेश येसेकर
भद्रावती : तालुका प्रतिनिधी
भद्रावती : शहरात तर भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेतच पण आता ग्रामीण भागातही भाज्यांचे दर महाग झाले आहेत. काही ठिकाणी पाऊस नसल्याने तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे.त्यामुळे भाजीपाल बाजारात येत नाही. विभागात पावसाने पाठ फिरवल्याने भाजीपाल्याचे उत्पादन कमी होत आहे. . सोबतच खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केलेली नाही. यामुळे बाजारातील आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
काही दिवसांपूर्वी ४० रुपये किलोवर असलेले टोमॅटो आता १०० ते १२० रुपये, तर मिरचीचे दर दुपटीने वाढून १००ते १२५ रुपयांवर पोहोचले आहेत. भाजीपाल्याची ही दरवाढ प्रामुख्याने गेल्या पंधरवड्यात झाली आहे. केवळ टोमॅटो, हिरवी मिरचीच नव्हे तर मेथी, भेंडी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्यांचे दर १०० ते १२० रुपये किलोदरम्यान आहेत. कोथिंबीर २०० रुपये तर उन्हाळ्यात १५० रुपये किलोवर पोहोचलेले लिंबाचे दर आता केवळ २०ते३० रुपये आहेत.
दरवाढ झाल्याने अनेक विक्रेत्यांनी देखील कमी प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी ठेवला आहे. पावसानंतर दर कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या पहिल्या टप्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढतात. पण, ही स्थिती जास्त दिवस राहत नाही.
बाजारात सध्या पावसामुळे लसणाची आवक कमी होत असून त्यामुळे दर वाढत आहेत गुजरात,मध्य प्रदेश हिमाचल मधून लसणाची आवक होत आहेत.मात्र आवक कमी झाल्याने दिवसेंदिवस दरात वाढ होताना दिसत आहे. सध्या घाऊक बाजारात प्रतिकिलो उटी लसूण २०० रुपये व देशी लसूण १५० रुपये आणि किरकोळ बाजारात २०० ते २५० रुपयांवर पोहचला आहे. जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात होते.सुरुवातीला लसणाचे दर आवाक्यात असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते.परंतु एप्रिलपासून आवक कमी झाल्याने भाव वधारण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात किरकोळ बाजारात लसूण ५० ते ६० रुपये इतके होते.
एप्रिल महिन्यापासून लसणाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.सध्या घाऊक बाजारातच लसूण दिडशे रुपयांवर गेले असून,उटी लसूण २०० रुपये व देशी लसूण १५० रुपयांनी विक्री होत आहे, तर किरकोळ दर २०० रुपयांवर गेला आहे.पुढील काही दिवसात दर वाढणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. एमएसपी समितीचे सदस्य विनोद आनंद यांच्या मते, भाज्यांच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. देशाच्या सर्व भागातून महागड्या भाज्या शहरांमध्ये येतात. एका दुकानदाराला याबाबत विचारले असता. ते म्हणतात की भाज्या विकून होणारा फायदा हा मधला एजन्ट किंवा व्यापारी यांना होतो.
प्रत्यक्षात शेतकऱ्याला मात्र पैसे कमीच मिळत आहेत. भाज्यांचे दर वाढले तरी शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नाही. देशातील सर्वच भागात मध्यस्थांची कमाई वाढत आहे. यासोबतच व्यावसायिकांचीही कमाई होत आहे. व्यापारी शेतकऱ्याकडून अगदी किरकोळ दरात २० ते ३० रुपयात शेतमाल उचलतात आणि तोच शहरांमध्ये १०० ते १५० रुपयांना विकत आहेत.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...