वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : राजेश येसेकर
भद्रावती :;तालुका प्रतिनिधी
भद्रावती :- मी अशा कठीण प्रसंगातून गेली आहे. राजीवचे निधन झाले तेव्हा राहूल तुमच्या मुलांपेक्षा राहूल छोटा होता. धीर सोडून नका. गांधी कुटुंबिय तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे ज्येष्ठ काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधींनी सात्वंन केले. मायेने जवळ घेतले. त्यावेळी आमदार धानोरकर गहीवरल्या आणि सोनिया गांधीचेही डोळे पाणावले. याप्रसंगी काँग्रेस नेते तथा माजी खासदार राहूल गांधी उपस्थित होते.
राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले. ते रुग्णालयात असताना आणि त्यांच्या निधनानंतर राहूल गांधी धानोरकर कुटुंबीयांच्या संपर्कात होते. त्यांना आज शुक्रवारला भेटीसाठी दिल्ली येथे बोलाविले. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत आमदार प्रतिभा धानोरकर, त्यांचे दोन्ही मुल मानस आणि पार्थ, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर प्रवीण काकडे उपस्थित होते. याप्रसंगी राहूल गांधी यांचीही उपस्थिती होती. आमदार धानोरकर यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा सारा घटनाक्रम सांगितला. धानोरकरांच्या निधनानंतरची परिस्थिती कथन केली. त्यावेळी सोनिया गांधींनी त्यांच्यावरही अशीवेळ आली होती, याची आठवण करुन दिली. तुमच्या मुलांपेक्षाही तेव्हा राहूल लहान होते. मलाही खुप त्रास झाला, याची आठवण करुन दिली. आमदार धानोरकर आणि दोन्ही मुलांना मायेने जवळ घेतले. गांधी कुटुंबिय तुमच्या नेहमी पाठीशी राहीली. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधा, असे सांगितले. राहूल गांधींनी स्वीय सहाय्यकाचा आणि स्वतःचा भ्रमणध्वनी आमदार धानोरकरांना दिला. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधण्यास सांगितले. मुल लहान आहे. राजकारण होतच राहील. त्यांची काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी दिला. आमदार धानोरकरांना सोनिया गांधींना मायेने जवळ घेतले. तेव्हा त्यांचा बांध फुटला. गांधींचेही डोळे पाणावले. राज्यातील एकमेव खासदार असल्यामुळे धानोकरांचा सोनिया गांधीशी थेट संपर्क होता. त्या त्यांना नावानिशी ओळखत होत्या. आठ महिन्यांपूर्वीच धानोरकर दांम्पत्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...