Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / चंद्रपुरात शिवसेना...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

चंद्रपुरात शिवसेना पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागा! पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरणभाऊ पांडव

चंद्रपुरात शिवसेना पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागा!   पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरणभाऊ पांडव

चंद्रपुरात शिवसेना पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागा-पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरणभाऊ पांडव

 

 

रीपोर्टर : राजेश येसेकर

भद्रावती : तालुका प्रतिनिधी

 

 

भद्रावती : शिवसेना पक्षाचे  l नेते तथा  मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आदेशाने मा. किरणभाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख  यांच्या अध्यक्षतेखाली हिरई गेस्ट, सि. टी. पी. एस. येथे चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली . या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची सध्यास्थिती जाणून घेवुन जिल्ह्यात शिवसेनेचा प्रचार व प्रसार कसा करता येईल व शिवसेना वाढीसाठी जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी विशेष लक्ष कसे देता येईल याबाबत मार्गदर्शन करुन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून शासनाच्या विविध योजनेचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचे आव्हान केले .शिवदूत व बुथ प्रतिनिधी तथा प्रत्येक तालुक्याची शिवसेना युवासेना, महिला आघाडी कार्यकारणी त्वरित तयार करण्यात यावी, अशी मोलाची सूचना केली .येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधि कसे निवडून येईल व चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना पक्ष कशा मजबूत होईल याचे सविस्तर मार्गदर्शन माननीय किरण पांडव यांनी केले .बैठकीत श्री बंदूभाऊ हजारे सहसंपर्क प्रमुख चंद्रपूर, जिल्हाप्रमुख नितीन मत्ते,  सौ . योगिता लांडगे, सुर्या अडबाले यांना सूचना देऊन शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्या लवकरात लवकर कार्यकारणी तयार करण्यात याव्या व जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मी सदैव आपल्या सोबत उभा राहील अशी ग्वाही दिली .अनेकांचे पक्षप्रवेश माननीय नितीन मत्ते चंद्रपूर शिवसेना जिल्हा प्रमुख यांचे नेतृत्वात व किरण पांडव यांचे मुख्य उपस्थितीत घेण्यात आले . वरोरा तालुक्यातील फत्तापूर ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री विलास वायदुडे यांनी श्री नितीन मते जिल्हाप्रमुख यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री किरण पांडव यांचे उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यामुळे शिवसेनेला वरोरा तालुक्यात अधिक बळकटी मिळेल अशी आशा माननीय किरण भाऊ पांडव यांनी व्यक्त केली . चंद्रपूर तालुक्यामधील राजकीय व माजी पत्रकार संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्त्ता तरुण येनगंटीवार व इतर यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला. तसेच जिवती तालुक्यातील अनेकांनी पक्ष प्रवेश केला . त्याच बरोबर  पोंभूर्णा तालुक्यातील सुद्धा अनेकांचा पक्षप्रवेश यावेळी घेतला . यावेळी श्री हर्षल भाऊ शिंदे युवासेना कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र ,शुभम नवले युवा सेना कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश,श्री बंडूभाऊ हजारे सह संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा,सौ योगिता ताई लांडगे महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रपूर,श्री सूर्या अडबाले युवा सेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर,श्री अरविंद धिमान वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख चंद्रपूर,तथा श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर तथा शहर प्रमुख भद्रावती, चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, नेताजी गहाणे सिंदेवाही तालुका प्रमुख, नरेन्द्र नरड ब्रम्हपूरी तालुका प्रमुख, मनोज लड़के नागभिड तालुका प्रमूख, पंकज वडेट्टीवार पोंभूर्णा, राकेश राठोड कोरपना, भरत बिरादर जिवती, सचिन गोरे राजूरा, नरेश काळे भद्रावती, श्रीकांत खंगार वरोरा, सुधिर कारंगल चंदपूर, अविनाश उईके, पहानपट्टे, संतोष ढोक, सुंदरसिंग बावरा, राजू सारंगधर, चेतन घोरपडे, अशोक चांदेकर, सौ . ज्योती लांदगे, सौ . तृप्ती हिरादेवे, अमोल माकोडे, सागर माकोडे सर्व तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख, महिला आघाडी तालुका प्रमुख, युवा सेना तालुका प्रमुख, सर्व विभागाचे शहर प्रमुख, उप तालुका प्रमुख व शिवसैनिक या आढावा बैठकीला उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...