Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / स्व. सिंधुताई सपकाळ...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण      स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण

 

 

स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

 

 

रीपोर्टर : राजेश येसेकर

भद्रावती : तालुका प्रतिनिधी

 

 

 

भद्रावती : स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर तर्फे स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक अभियान अंतर्गत ट्रस्टनी दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यापैकी तालुक्यातील घोडपेठ येथील तीन विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.           

        भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील अश्वजीत रामकिसन सोनटक्के व त्याची पत्नी हया कोरोणा काळात दगावल्यामुळे यांची दोन्ही मुले भार्गवी व गौरव हे पोरके झालेत. आजी कवडाबाई सोनटक्के हे गरीब परीस्थीती नातवांचा सांभाळ करीत आहे. तसेच कोरोणा काळातच देवराव कृष्णाजी लांडे हे मयत झाले. त्यांच्या दोन्ही मुलींचा शिक्षणाचा खर्च ट्रस्टनी उचलला. ट्रस्टचे उपक्रम स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक अभियान अंतर्गत मागील वर्षी भार्गवी, गौरव, सिमरण व सौदर्या हयांना ट्रस्टीनी शिक्षणाकरीता दत्तक घेतले. यावर्षी सुध्दा दत्तक विद्यार्थ्याना शिक्षणाकरीता लागणारे शिक्षण शुल्क, पुस्तके, वहया, पेन, पेन्सील, युनीफार्म, जोडे, स्कुल बॅग, रेनकोट असे साहित्य ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, समाजिक कार्यकर्त्या व ट्रस्टचे सदस्या सुषमा शिंदे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. शैक्षणिक दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत ट्रस्ट यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व दत्तक विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण करुन देईल व ट्रस्ट तर्फे विविध समाज उपयोगी अभियान राबविल्या जात असून गरजूंनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे म्हणाले.  स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत वरोरा भद्रावती तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना ट्रस्टनी दत्तक घेतले असून दत्तक विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले असून ट्रस्टनी शिक्षणाकरीता नविन दत्तक विद्यार्थ्यांना सुध्दा शैक्षणिक साहित्य  वितरीत करण्यात येत आहेत.          

        यावेळी ट्रस्टचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले,  सदस्या सुषमाताई शिंदे, दत्तक विद्यार्थ्यांचे पालक कवडाबाई सोनटक्के, किरण देवराव लांडे व इतर मंडळी  उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...