Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / खासदार बाळूभाऊचे स्वप्न...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

खासदार बाळूभाऊचे स्वप्न पूर्ण करणार – आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे प्रतिपादन.

खासदार बाळूभाऊचे स्वप्न पूर्ण करणार – आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे प्रतिपादन.

खासदार बाळूभाऊचे स्वप्न पूर्ण करणार – आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे प्रतिपादन.

 

 

रीपोर्टर : राजेश येसेकर

भद्रावती : तालुका प्रतिनिधी

 

 

भद्रावती : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांची आज जयंती करण्यात आली. एक महिन्या आधी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जयंतीनिमित्त तालुका, शहर काँग्रेस कमिटी भद्रावती द्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व नोटबुकचे वितरण तसेच छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

भद्रावतीचे भूमिपुत्र असलेले महाराष्ट्रातले काँग्रेसचे एकमेव खासदार स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त भद्रावती शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वागत सेलिब्रेशन भद्रावती या हॉलमध्ये आमदार प्रतिभाताई धानोरकर, मातोश्री वत्सलाबाई धानोरकर, नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजताच त्यांना अभिवादन करण्यात आले. “रक्तदान सर्वश्रेष्ठ दान” यावर विश्वास ठेवून स्व.बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त जवळपास ६० युवकांनी रक्तदान देऊन ही जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. रक्तदान घेण्याकरिता चंद्रपूर येथील राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. स्व. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा घुटकाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना बॅग व नोटबुकचे वितरण करण्यात आले. त्यासोबतच आमदार प्रतिभाताई धानोरकर, मातोश्री वत्सलाबाई धानोरकर व अनिल धानोरकर नगराध्यक्ष भद्रावती यांच्या हस्ते गरजूंना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना चंद्रपूर आणि लोकसभा मतदारसंघाचे विकास पुरुष स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांनी क्षेत्राच्या विकासासाठी ध्यास घेतला होता. तो विकासाचा अर्धवट राहिलेला रथ आपण पूर्ण करणार. स्व. खासदार बाळूभाऊ धानोरकर हे सामान्य समाजाचे खरे नेतृत्व होते, असे उद्गार काढले.

     यावेळी मातोश्री वत्सलाबाई धानोरकर, अनिल भाऊ धानोरकर नगराध्यक्ष भद्रावती हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी, संतोष आमने उपाध्यक्ष, समस्त नगरसेवक, तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.माला प्रेमचंद, प्रशांत काळे तालुका काँग्रेस अध्यक्ष, सुरज गावंडे शहर काँग्रेस अध्यक्ष, प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, सुधीर पारधे, हनुमान घोटेकर, अब्बास आजानी, प्रफुल चटकी , चंद्रकान्त खारकर आदी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...