वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : राजेश येसेकर
भद्रावती : तालुका प्रतिनिधी
भद्रावती : येथील लोकसेवा मंडळ भद्रावती द्वारा संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या आशालता सोनटक्के यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्य एका समारंभात भावपूर्ण निरोप देण्यात आला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून लोकसेवा मंडळाचे सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार, संचालक सेवानिवृत्त प्राचार्य गोपालराव ठेंगणे, सदस्य दत्तात्रय गुंडावार, सत्कारमूर्ती प्राचार्या आशालता सोनटक्के, उपप्राचार्य सचिन सरपटवार, पर्यवेक्षक रुपचंद धारणे, लोकमान्य ज्ञानपीठाच्या प्राचार्या पूनम ठावरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते
सर्वप्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अनेक वक्त्यांनी प्राचार्या सोनटक्के यांच्या कार्याचा गुणगौरव केला. तसेच यावेळी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते सोनटक्के यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, साडी-चोळी व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे प्राचार्य सचिन सरपटवार यांच्या हस्ते सोनटक्के यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, साडी-चोळी व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोकसेवा कर्मचारी सहकारी पतसंस्था, लोकमान्य ज्ञानपीठ आणि शालेय पोषण आहार महिला कर्मचारी यांच्या तर्फेही सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्या सोनटक्के यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक रुपचंद धारणे यांनी केले. संचालन शिक्षिका प्राजक्ता चिखलीकर यांनी केले. तर आभार शिक्षिका मीनाक्षी वासाडे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी प्राचार्य उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...