वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
गुरूपौर्णिमा निमित्ताने संगीत मैफल संपन्न
रीपोर्टर : राजेश येसेकर
भद्रावती : तालुका प्रतिनिधी
भद्रावती : स्थानिक बगडेवाडी येथे संपन्न झालेल्या स्वर्गीय सिंधुताई व श्री महादेवराव लक्ष्मण पावडे यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित संगीत मैफिलीत पुणे येथून आलेल्या गायकांच्या सुश्राव्य गायनाने भद्रावतीकर रसिक मंत्रमुग्ध झाले. ३ जुलैला गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या मैफलीमध्ये पुणे येथील प्रसिद्ध संगीत कलावंत पंडित बाळासाहेब वाईकर, निवृत्ती धाबेकर, पांडुरंग पवार यांच्यासह सुधांशू धाबेकर,सुरेश कुडे, बालाजी कामडी, सुधाकर जाधव,सचीन मत्ते यांनी संगीतातील विविध नैपुण्य सुरेल आवाजात सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. चंद्रपूरचे माजी पोलीस उपाधीक्षक श्रीराम तोडासे, सह्याद्रीचा राखणदारचे वरिष्ठ संपादक तथा स्तंभलेखक डॉ. यशवंत घुमे व भद्रावती नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर संगीत मैफल सुरू झाली.यावेळी शास्त्रीय संगीत,गझल,ठुमरी,अभंग,भजन, गौळण, क्लासिक संगीत व रसिकांच्या आवडीची गाणी गावून कलावंतांनी रसिकांना मनोरंजनाची मेजवानी दिली. या मैफलीचे प्रास्ताविक डॉ. मयुरा अवताडे, संचालन संजय घुगूल ,आभारप्रदर्शन दशरथ पावडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनाली व सचिन पावडे, दशरथ पावडे, घनश्याम झाडे, मोहन अवताडे संजय जेनेकर,जितेश उरकुडे, अनिल रामटेके यांनी परिश्रम घेतले. या मैफिलीत संगीत ऐकण्यासाठी भद्रावती शहरातील रसिक श्रोत्यांसह चंद्रपूर, वरोरा, वणी यांसह विविध शहरांतील अनेक रसिक उपस्थित झाले होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...