वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
कर्नाटक एम्टा खुल्या खालील घटना
रीपोर्टर : राजेश येसेकर
भद्रावती : तालुका प्रतिनिधी
भद्रावती : कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा टिप्परने टाकण्यात येणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबुन मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी भद्रावती पोलीसांनी त्या टिप्पर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
विनोद बरडे वय ४५वर्ष रा. बरांज असे या मृत कामगाराचे नाव आहे. कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीत आर टी एम या कंपनीला मातीचे उत्खनन करण्याचे काम दिले आहे. हा कामगार तिथे वाहनाला दिशा दाखवण्याचे काम करत होता. घटनेच्या दिवशी तो डिवटिवर असतांना एका टिप्पर चालकाने तो उभा असलेल्या जागेवर मातीचा ढिगारा टाकल्याने त्यात दबला गेला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पहाटे भद्रावती पोलीसांना देण्यात आली. घटनास्थळी ठाणेदार बिपीन इंगळे यांनी घटनेची माहिती घेतली. घटनास्थळी कामगार नेत्यांनी मृतकाच्या नातेवाईकांना आर्थिक मोबदला द्यावा याकरिता घेराव घातला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण ै होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविला व यातील आरोपी टिप्पर चालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...