वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : राजेश येसेकर
भद्रावती : तालुका प्रतिनिधी
भद्रावती :- मुलाने बापाला आपल्या पेन्शन मधील पैसे मागीतले पण बापाने पैसे देण्यास नकार दिला. म्हणून रागाच्या भरात मुलाने आपल्या बापाला दांड्याने व दगडाच्या सहाय्याने जीवनाशी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भद्रावती शहरातील अहिल्यादेवी नगर येथे दिनांक १ रोज शनिवारला घडली. या घटनेत बाप गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी प्रथम शहरातील ग्रामीण रुग्णालयात व नंतर चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी सुरज गुलाब दाते (३५) याला अटक केली आहे. गुलाब लक्ष्मण दाते वय (७२)वर्षे हे शहरातील अहिल्यादेवी नगरात राहतात. त्यांचा मुलगा सुरज दाते हा त्यांना नेहमी पेन्शनचे पैसे मागायचा मात्र त्याचे वडील गुलाब दाते हे त्याला पेन्शनचे पैसे देण्यास नकार देत होते. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. घटनेच्या दिवशी आरोपी सुरज दाते याने आपले वडील गुलाब दाते यांना पेन्शनचे पैसे मागितले असता त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर गुलाब दाते हे झोपेत असताना मुलगा सुरज याने लाकडी दांडा व दगडाच्या साह्याने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सुरज दिते याला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...