वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : राजेश येसेकर
भद्रावती : तालुका प्रतिनिधी
भद्रावती / वरोरा : शहरालगतच्या आनंदवन परीसरातील त्रिमूर्ती नगर येथे वास्तव्यास असलेल्या सुदाम लहाणु खिरटकर यांच्या घरातील मंडळी बाहेर गेले असता चोरट्यांनी सहा लाख ८५ हजार रुपये लंपास केले.
सदर घरातील सदस्य २८ जुनला सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून शेजाऱ्याकडे बसावस गेले होते. संध्याकाळी सहा वाजता घरी परत आले असता पुढील दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले घरात बघितले असता घरातील सहा लाख ८५ हजाराचे सोन्याचे दागिने व रोख चोरट्यांनी लंपास केल्याची दिसून आले. या घटनेची माहिती वरोरा पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने अवघ्या चार तासात हिंगणघाट येथून दोन चोरट्यांना ताब्यात घेतले एक चोरटा फरार झाला त्याचा शोध वरोरा पोलीस घेत आहे.
वरोरा पोलिसांनी घटनास्थळाजवळचे सीसी टीव्ही फुटेंची पाहणी केली. त्यात चोरट्यांचे चेहरे स्पष्ट आले त्यानंतर आनंदवन चौकात वरोरा पोलीस स्टेशन तर्फे लावण्यात आलेले सीसीटीव्ही पाहणी केली असता चोरटे दुचाकी वाहनाने नागपूर दिशेने गेले असल्याचे दिसून आले वरोरा पोलिसांनी हिंगणघाट येथे जाऊन विशाल उर्फ बबलू गायकवाड वय ३२ वर्ष व राम पवार वय २६ वर्ष या दोघांना अवघ्या चार तासात ताब्यात घेतले त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला यामध्ये आणखी एकाचा समावेश असलेल्या आरोपीचा वरोरा पोलीस शोध घेत आहे. घरफोडी करणाऱ्या तिघांवरही नागपूर वर्धा जिल्ह्यात अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सदर घटनेचा तपास वरोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार व त्यांचे सहकारी करीत आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...