वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
भद्रावती शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण.
*रीपोर्टर : राजेश येसेकर* *भद्रावती :तालुका प्रतिनिधी*
भद्रावती : शहरातील जवळे प्लॉट येथील एका घरात चोरी करून अज्ञात चोरट्यांनी ३८ ग्रैम सोन्याच्या दागिन्यांसह ३५०० रोख रक्कम लांबविल्याची घटना दिनांक २८ रोज बुधवार ला मध्यरात्री जवळे प्लाट येथे घडली. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
. बंडू कडूकर हे जवळ प्लॉट येथील आपले सासरे बडवाईक यांच्या घरी वरच्या माळ्यावर राहतात. सासरे एकटेच असल्यामुळे त्यांचे कुटुंब हे खालच्या माळ्यावर रोज सासऱ्याकडे झोपायला येतात. घटनेच्या दिवशी रात्रोला जेवण झाल्यानंतर सर्व कुटुंब हे नेहमीप्रमाणे खाली सासऱ्याकडे झोपण्यासाठी आले होते. सकाळी वरच्या माळ्यावरील आपल्या घरी गेले असता त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यानंतर त्यांनी घरात तपासून बघितले असता त्यांच्या घरातील तीन तोळ्यांची पदक असलेली सोन्याची पोत, प्रत्येकी चार ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व ३५०० रोख रक्कम नाहीशी झाल्याचे दिसून आले.सदर घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे. शहरात अलीकडे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून यामुळे नागरिकांमधे चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.शहरात पोलीस गस्त वाढविण्यात यावी अशी जनतेची मागणी होत आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...