Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *मा.आमदार.विजयभाऊ यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*मा.आमदार.विजयभाऊ यांच्या कडून चकपिरंजी येथे आ स्थानिक निधी योजनेंतर्गत हातपंपाचे काम संपन्न.* *सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांच्या सतत प्रयत्नातून ४० वर्षापासुन प्रतीक्षेत असलेली पाण्याची समस्या निकाली, ग्रामस्थांनी मानले आभार*

*मा.आमदार.विजयभाऊ यांच्या कडून चकपिरंजी येथे आ स्थानिक निधी योजनेंतर्गत हातपंपाचे काम संपन्न.*    *सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांच्या सतत प्रयत्नातून ४० वर्षापासुन प्रतीक्षेत असलेली पाण्याची समस्या निकाली, ग्रामस्थांनी मानले आभार*

*मा.आमदार.विजयभाऊ यांच्या कडून चकपिरंजी येथे आ स्थानिक निधी योजनेंतर्गत हातपंपाचे काम संपन्न.*

 

सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांच्या सतत प्रयत्नातून ४० वर्षापासुन प्रतीक्षेत असलेली पाण्याची समस्या निकाली, ग्रामस्थांनी मानले आभार

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक२७

३००० लोकसंख्या असलेले गाव चकपिरंजी येथे मागील ४० वर्षांपासून प्रतीक्षेत पाण्याची समस्या निकाली आज दिनांक २७ जून २०२३  ला मौजा चकपिरंजी येथे माननीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेब माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत हात पंप मंजूर झाले होते आज रोजी हात पंप मारण्यात आले. गावकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व आमदारसाहेबांचे आभार मानले.

हातपंपाचे लोकार्पण गावच्या प्रथम नागरिक, सरपंच सौ.उषाताई गेडाम व उपसरपंच मा.अरविंद भैसारे यांचे हस्ते विधिवत पूजा करत संपन्न झाले. लोकनेते, आमदार मान.विजयभाऊ वडेट्टीवार हे खरे विकासपुरुष असल्याचे पुन्हा एखादा सिद्ध झाले. दिलेला शब्द पडणारा नेता अशी भावना जन-मानसात आहे तीच भावना पुन्हा एकदा सिद्ध झाली.

 चकपिरंजी गावात पाण्याची गंभीर समस्या असल्याचे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीन गोहने  यांनी आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या निर्दषणात आणून दिले.आज कित्येक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले. १-२ किमी अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.आज हातपंप गावात आल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. यामुळे ग्रामस्थांनी मा.आमदार विजय वडेट्टीवार व तालुका अध्यक्ष नितीन गोहने यांचे आभार मानले. मा.आमदार.विजयभाऊ वडेट्टीवार  यांना पुन्हा जनसेवेची संधी मिळावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

    यावेळी चकपिरंजी ग्राम काँग्रेसचे अध्यक्ष मा.युवराज पेंदाम, ग्रामपंचायत चकपिरंजीचे सदस्य मा.अमृत चौधरी, वेणूदास मडावी, मेहमुदा शेख व शिवाजी वाडगुरे, कर्णी स्वामी, अतुल चौधरी,मोहन भोपये, गजानन आदे व इतर गावकरी उपस्थित होते.सावली तालुक्यात मंजूर असलेल्या ठिकाणी लवकरच हात पंपाचे काम करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...