Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / कत्तलीसाठी जाणाऱ्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा जनावरांची चारचाकी गाडीतून सुटका

कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा जनावरांची चारचाकी गाडीतून सुटका

कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा जनावरांची चारचाकी गाडीतून सुटका

 

 

रिपोर्टर : राजेश येसेकर

 

भद्रावती : तालुका प्रतिनिधी

 

भद्रावती :   चारचाकी वाहनातून कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनांची भद्रावती पोलिसांनी कारवाई केली.

      तालुक्यातील घोटनिंबाळा फाटा येथून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांच्या वाहनांची गुप्त माहिती. भद्रावती पोलिसांना मिळाली होती. या आधारे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता नागपूर - चंद्रपूर मुख्य मार्गावरील  निंबाळा फाट्याजवळ चारचाकी वाहनातुन कत्तलीसाठी जाणाऱ्या  सहा जनावरांची सुटका केली ही कारवाई पहाटे चारच्या दरम्यान करण्यात आली.

स्वप्निल उर्फ सोनू स्वानंद शेंडे ,समीर आयुब कुरेशी दोन्ही राहणार चंद्रपूर असे आरोपींचे नाव असून  एक लाख तीस हजार  किमतीची जनावरे व वाहन जप्त करण्यात आले. आणि यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. भद्रावती पोलिसांची आठवडाभऱ्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.

सदरची कार्यवाही मा. आयुष नोपाणी साहेब यांचे मार्गदर्शनात पो नि. बिपीन इंगळे गुन्हे शोध पथकाचे सपोनि मुळे, पोलीस अंमलदार अनुप आस्तुणकर, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुदरी यांनी केली.

ताज्या बातम्या

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास. 07 December, 2024

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास.

वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...

जनता जनार्धानी दिलेला कौल मला मान्य आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार. 07 December, 2024

जनता जनार्धानी दिलेला कौल मला मान्य आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभेत केलेले काम पहाता निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय निश्चित...

जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या -मनसे 06 December, 2024

जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या -मनसे

वणी :सब एरिया वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड, निलजई यांच्या अधिनस्त असलेलल्या निलजई येथील जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये...

वणी मध्ये क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचा पुढाकार. 05 December, 2024

वणी मध्ये क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचा पुढाकार.

वणी:- दिनांक सात व आठ डिसेंबर 2024 रोजी शासकीय मैदान, वणी येथे छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमच्या वतीने क्रिकेट लीग...

देवेंद्रपर्व...शपथविधी मुंबईत जल्लोष वणीत, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर. 05 December, 2024

देवेंद्रपर्व...शपथविधी मुंबईत जल्लोष वणीत, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर.

वणी : राज्यात महायुतीने दणदणीत अभूतपूर्व यश संपादन केले. नागरिकांना सत्ता स्थापनेची उत्सुकता होती. अखेर शपथविधीला...

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...