युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
घुगुस:-पडोली कडून मारेगाव कडे जाणाऱ्या बोलेरो क्रमांक एम एच 29/बीसी 6321 या वाहनाचा टायर फुटल्याने बोलेरो वाहन डिवायडरच्या विरुद्ध बाजूला गेली त्याच वेळेस घुग्घूस कडून येणाऱ्या ट्रक ला जबर धडक दिली यात बोलेरो वाहना मधील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारला दुपारी 1.45 वाजता पडोली -घुग्घूस मार्गावरील अहमद लॉन (नागाळा)जवळ घडली.
जाग्यावरच मृत्यू झालेल्याची नावे सानिया कोल्ड्रिंग हाऊस व शानू ऑटोमोबाईल चे संचालक युसूफ शेख व रफिक शेख व दोघांच्या पत्नी सर्व रा.मारेगाव जिल्हा यवतमाळ असे आहे.
या घटनेची माहिती पडोली पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बोलेरो वाहनातील मृतकाना बाहेर काढले व चारही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे शव विच्छेद करण्यासाठी पाठविण्यात आले.या घटनेचा पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.
दोघे सखे भाऊ व त्या दोघांच्या पत्नी जाग्यावरच मरण पावल्यामुळे त्यांच्या परिवारात शोककळा पसरली असून मारेगाव येथील नागरिकामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...