रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-जिल्हातील आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरली आहे.सामान्य रुग्णांचे बेहाल सुरु आहे. प्रशासनाला आरोग्य सुविधा पुरविण्याचा वारंवार सूचना देऊनही त्याकडे फार गांभीर्याने प्रशासनाने बघितले नाही याला वैतागलेल्या उपसरपंचानी उपकेंद्राला टाळे ठोकले.हा प्रकार कोरपना तालुक्यातील खिर्डी येथे घडला.
जिल्हातील कोरपना तालुक्यात येणाऱ्या नांदा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या खिरडी गावात आरोग्य सुविधेचा अभाव आहे. त्याला कारण ठरले येथील आरोग्य सेविका. आरोग्य सेविका मुख्यालयाला हजर राहत नाही. परिणामी वेळेवर रुग्णांना उपचार मिळू शकत नाही.यामुळे गावकरी संतप्त झालेत. त्यांनी ही समस्या उपसरपंच दीपक खेकारे यांना सांगितलं.खेकारे यांनी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर गावातील नागरिकांना सोबत घेऊन खेकारे यांनी आज उपकेंद्राला कुलूप ठोकले.दोन तासानंतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी भेट दिली.एक महिन्याच्या आत मी मुख्यालयाला राहील,असे लेखी आश्वासन आरोग्य सेविका यांनी लिहून दिल्यानंतर आरोग्य उपकेंद्राला लावलेले कुलूप उघडण्यात आले.
शासन कर्मचाऱ्यांना पगार देतात परंतु कर्मचारी नियमाची पायमल्ली करतात सदर आरोग्य सेविकांनी उद्धट भाषेत माझ्याशी संभाषण केले असून असा लोकप्रतिनिधी चा अपमान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाही करायला हवी
दिपक खेकारे
उपसरपंच ग्रा.प. खिर्डी
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...