युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
सुरक्षा अधिकारीचा अपघातग्रस्त ? सामान्य जनतेचे रक्षण कसे होईल ?
घुग्घूस : शहरातील लॉयड्स मेटल्स कंपनीचा मुख्य प्रवेशद्वार हा अत्यंत धोकादायक झालेला असून कंपनीतुन निघणाऱ्या जडवाहणाने अपघातांच्या घटनेत वाढ होत असून सदर प्रवेश द्वार हा धोकादायक झालेला आहे.
हा प्रवेश द्वार सुरक्षित असल्याचा व वाहनाच्या आवागमन प्रसंगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली असल्याने अपघातांची शक्यता नसल्याची ग्वाही देणाऱ्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांचाच अपघात झाल्याने लॉयड्स मेटल्स कंपनीची भूमिका ही फसवी असल्याचे उघड झाले असून लॉयडस मेटल कंपनीचा मुख्य प्रवेश द्वार हा शहरातील मध्य भागातून बंद करावा अशी मागणी घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
शहरातील मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक परिसर ,राजीव रतन चौकाकडे जाणारा मार्ग व जुन्या वस्तीकडे जाणारा मार्ग,एसीसी कंपनी व नकोडा - ऊसगाव कडे जाणारा हा संपूर्ण मार्ग छत्रपती शिवाजी चौकात येऊन मिळतो याठिकाणी अर्थात मुख्य चौकात लॉयड्स कंपनीने आपला मुख्य प्रवेशद्वार उभारला असून या ठिकाना वरून दिवस रात्र कोळश्याचे जडवाहन तसेच सुरजागड येथून येणारे लोह खनिजांचे ओव्हरलोड जडवाहन मोठया संख्येने आवागमन करीत आहे.
या व्यतिरिक्त शहरातील संपूर्ण खाजगी वाहतूक व्यवसायिक वाहने राज्य परिवहन महामंडळाचे वाहने एकाच जागी येत असल्याने प्रचंड भयानक अशी परिस्थिती या चौकात निर्माण झालेली आहे
गेल्या आठवड्यात या चौकात सकाळी सहाच्या सुमारास एका दुचाकीने जात असलेल्या दाम्पत्यांचा अपघात झालेला आहे
सुदैवाने ते या अपघातात बचावले आहेत.
काल दिनांक 19 जून रोजी रात्री सात ते आठच्या दरम्यान लॉयड्स कंपनीचे मुख्य सुरक्षा अधिकारी नाकाडे यांच्या दुचाकी वाहनाला कंपनीच्या रस्त्यावरच जडवाहणाने धडक दिली
यात नाकाडे सुदैवाने बचावले त्यांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची तक्रार घुग्घूस पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
या रस्त्यावर कंपनीचे अधिकारीच सुरक्षित नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या जीविताची हमी कोण घेणार ?
लॉयड्स कंपनीचा मुख्य मार्ग बंद करून मागील बाजूने कमी रहदारीच्या ठिकाणाहून नवीन रस्ता निर्माण करण्यास बाध्य करावे व मुख्य मार्गावर शहरातील निष्पाप नागरिकांचा अपघाती जीव घेल्यास कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हाची नोंद करून कारवाई करण्यात यावी व अपघातग्रस्त व्यक्तीला पन्नास लाख रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई ही कंपनी तर्फेच देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे
सदर मागणी पूर्ण न झाल्यास शहरवासिया तर्फे तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेळण्याचा इशारा रेड्डी यांनी दिला आहे
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,अलीम शेख,रोशन दंतलवार, विशाल मादर,रोहित डाकूर,नुरुल सिद्दीकी,अभिषेक सपडी,देव भंडारी, सुनील पाटील,रफिक शेख,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...