*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
शिक्षणाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर--गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजने अंतर्गत अगदी 1500 रु तुटपुंज्या मानधनात जिल्हा परिषद व प्रायव्हेट शाळेत दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी प्रचंड वाढलेल्या महागाईत जगावे कसे ? असा एक्ष प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.संघटनेच्या अथक संघर्षातून 9 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णय नुसार शापोआ कर्मचाऱ्यांच्या मानधनात एप्रिल महिन्या पासून 1000 रू.मासिक वाढ केलेली आहे .परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याने शापोआ कर्मचारी सरकार प्रती तीव्र नाराजी व्यक्त करत .कुटुंब चालण्या योग्य मानधन वाढ व किमान वेतन लागू करण्यात यावे यासह इतरही मागण्यासाठी आयाटक च्या नेतृत्वात 19 जून रोजी राज्यव्यापी आंदोलन ची हाक दिली होती त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय समोर संघटनेचे राज्य महासचिव कॉ विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात विशाल धरणे आंदोलन करून मा.दीपेंद्र लोखंडे शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
निवेदन देताना कॉ.विनोद झोडगे राज्य महासचिव शापोआ युनियन , कॉ.वनिता कुंठावार जिल्हा सचिव चंद्रपूर, भद्रावती चे माजी नगरसेवक तथा आयटकचे संघटक कॉ राजू गैनवार, श्रीधर वाढई,कुंदा कोहपरे, कॉ.रवींद्र उमाटे, कॉ.प्रकाश रेड्डी,लीलाताई आश्र्वले,ललिता कोवे,सुनीता बेलेकर, छाया मोहितकर,कल्पना रायपुरे,मनोज करकाडे,संध्या वासेकर,शंभाजी राय वाड,निर्मला गुरणुले,जयघोष दिघोरे यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनात कर्मचाऱ्यांन च्या विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली ज्या मध्ये कर्मचाऱ्यांना किमान 24 हजार वेतन देण्यात यावे,चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी, सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी,दर महिन्याला मानधन व इंधन बिल देण्यात यावे कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये,त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये ,सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी,सर्व शाळेत ग्यास सिलेंडर ,धान्यादि माल व खाद्य तेल उपलब्ध करून देण्यात यावे,दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे.12 महिन्याचे मानधन देण्यात यावे किमान वेतन मिळेपर्यंत दहा हजार रुपये मानधन वाढ लागू करण्यात यावी ,दिवाळी बोनस लागू करण्यात यावे दर 3 महिन्यातून जिल्हास्तरावर संघटने सोबत बैठक आयोजित करून स्थानिक समस्यांचा निपटारा करण्यात यावा यासह विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली.स्थानिक मागण्या त्वरित सोडविण्याचे व मानधन वाढीसाठी निवेदन राज्यसरकारला पाटविण्याचे शिक्षणा धिकारी यांनी मान्य केले .
येत्या महिना भरात मानधन वाढीचा निर्णय न झाल्यास पावसाळी अधिवेशनात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉ विनोद झोडगे यांनी दिला आहे.धरणे आंदोलनात जिल्हाभरातील 500 कर्मचारी सहभागी झाले होते.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...