रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
गडचांदूर काँग्रेसच्या वतीने १० वी, १२ वी च्या ११७ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:- गडचांदूर शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने आयोजित कोरपना तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वीतील प्राविण्य प्राप्त ११७ विद्यार्थ्यांचा लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आणि मान्यवरांचे हस्ते स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालय येथे सत्कार करण्यात आला. तसेच यानिमित्ताने विदयार्थ्यासाठी करियर गाईडन्सचेही आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आ. धोटे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सांगितले की, सद्याचे स्पर्धेचे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अपल्या आवडी प्रमाणे करियरची निवड केली पाहिजे. जिद्द चिकाटी, परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे. विदर्भातील खुप कमी विद्यार्थी सिव्हिल सर्व्हिस मध्ये जातात तेव्हा UPSC, MPSC व अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करून यशस्वी व्हावे असे आवाहन केले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर डॉ. सलीम चव्हाण, मेडिकल प्रवेश व राइस कोचिंग क्लास नागपूर रोशन पांडे आणि चंदन पाटक आदिंनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविताताई टेकाम, कृ उ बा स सभापती अशोक बावणे, सचिव धनजय गोरे, व्यापारी संघाचे अध्यक्ष हंसराज चौधरी, नगरसेवक पापय्या पोनलावार, गटनेते विक्रम येरणे, रौफ खान वजीर खान, शिवकुमार राठी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष दरेकर यांनी केले. प्रास्ताविक सचिन भोयर यांनी तर आभार प्रदर्शन संतोष महाडोळे यांनी केले. या प्रसंगी १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...