युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
शहर काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
घुग्घूस :-ते चंद्रपूर मुख्य मार्गाला लागूनच जवळपास विस ते पंचवीस कोल डेपो निर्माण करण्यात आलेले आहे.
या कोल डेपो मध्ये जाळीच्या माध्यमातून कोळश्याची गाळणी व छाटणी करण्यात येते यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कोळश्याचे कण मिश्रित धूळ उडत असल्याने शेतपिकाचे मोठे नुकसान होत आहे.
तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या डोळ्यात धूळ जाऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
या कोल डेपोचे वाहन ही विरुद्ध दिशेने येत असल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे
तसेच कोल डेपो मध्ये शासन मान्य परवानाच्या आत वेकोली मधून चोरी करण्यात येणारा कोळसा धानोरा गडचांदूर - राजुरा परिसरातील वेकोली खाणीतून निघणारा कोळसा वाहनातून चोरी अथवा अवैध खरेदी केलेला येथे विकल्या जातो त्या काळ्या कोळश्याला मोठ्या चलाखीने हे डेपो धारक पांढरा करून चढ्या दराने बाजारात विकतात व पांढऱ्या दगड मातीत कंपनीतुन निघणारी काळी चुरी मिक्स करून त्याला ही बाजारात विकल्या जात असल्याचा प्रकार होत असल्याची चर्चा करिता सदर प्रकरणाची योग्य ती शहानिशा करून सदर कोल डेपो या ठिकाना वरून अन्यत्र हटवा किंवा बंद करा अशी मागणी घुग्घूस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा यांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, रोहित डाकूर,रोशन दंतलवार,अभिषेक सपडी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...