Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावली हरांबा रस्ता...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावली हरांबा रस्ता पावसाळ्या अगोदर दुरुस्ती करून द्यावे- जनसेवा न्यूज मुख्य संपादक उमेश गोलेपल्लीवार*

*सावली हरांबा रस्ता पावसाळ्या अगोदर दुरुस्ती करून द्यावे- जनसेवा न्यूज मुख्य संपादक उमेश गोलेपल्लीवार*

*सावली हरांबा रस्ता पावसाळ्या अगोदर दुरुस्ती करून द्यावे- जनसेवा न्यूज मुख्य संपादक उमेश गोलेपल्लीवार*

 

 ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-सावली हरांबा या रस्त्यावर लोढोंली, साखरी, सिर्शी, देवटोक, पेडगाव, जिबगाव, उसेगाव.सिंदोळा ही गांवे असून या गावातील व आजुबाजुच्या परिसरातील नागरीक शेती व शेतीपुरक कामासाठी, नोकरीसाठी, व्यवसाय शिक्षणाकरीता या रस्त्याने ये-जा करतात. व

या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडून गिट्टी उखळलेली असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना खुपच आर्थीक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे. शाळकरी मुलांना आणि गर्भवती महिलांना तर भयंकर त्रास होतो. या रस्त्यावर गिट्टी उळखून मोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा अपघात झालेले असून अनेकांनी प्राण गमावले आहे. हा मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना प्रशासन या मार्गावरील खड्डे बुजवून मार्ग दुरुस्त करुन सुरळीत करुन देण्याचे सौजन्य दाखवत नाही. त्यामुळे परिसरातील जनतेमध्ये प्रशासकीय यंत्रणा व अधिकाऱ्यांनवर व लोकप्रतिनिधी बद्दल प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झालेले आहे पावसाळा येण्यापुर्वीच हा रस्ता दुरुस्त करुन डांबरीकरण होईल अशी या परिसरातील ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र प्रशासनाच्या चालढकलपणामुळे व दप्तर दिरंगाईपणामुळे व लोकप्रतिनिधी आमदार यांचे दुर्लक्ष असलेल्या मुळे परिसरातील नागरिक नाहक त्रास सहन करत या रस्त्यावरुन प्रवास करीत आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे सदर रस्त्याच्या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन व संबंधित विभागाने याची उचित दखल घेऊन लवकरात लवकर सावली हरांबा रोड दुरुस्ती करून द्यावे अशी मागणी जनसेवा न्यूज मुख्य संपादक उमेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...