Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *भारी येथे शासन आपल्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*भारी येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला सुरूवात* *आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण*

*भारी येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला सुरूवात*    *आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण*

*भारी येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला सुरूवात*

 

*आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती :- अतिदुर्गम, आदिवासी बहुल अशा जिवती तालुक्यातील मौजा भारी येथे महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमाची मोठ्या थाटामाटात सुरूवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजने अंतर्गत जिवती तालुक्यातील प्रात्र लाभार्थीना विविध योजनांतून मिळणाऱ्या शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आणि मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच विविध शासकीय विभागाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थीना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

       या प्रसंगी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सान, प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चंद्रपूर मा. एस. मुरुगनंथम, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसिलदार दिपक वजाळे, सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके, माजी जि. प. सदस्य भीमराव पा. मडावी यांचा हस्ते शासकीय योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शासकीय मदतीच्या धनादेशाचे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

         सर्वसामान्य नागरिकांना शासनाचा विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधी देण्या करिता शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमाव्दारे जिवती तालुक्यातील पात्र लाभार्थीना, आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटूंबाला धनादेश, रेशन कार्ड, आयुष्मान कार्ड, संजय गांधी व श्रावण बाळ योजन, जेष्ठ नागरीक कार्ड, रहिवाशी व उत्पन्नाचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रे आणि विवीध योजनेचे धनादेश वितरित करण्यात आले.

        या प्रसंगी कार्यक्रमचे प्रस्ताविक तहसिलदार दीपक वजाळे, सूत्रसंचालन अरुणा कवठे मॅडम तर आभार उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...