युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस शहरातील ड्रीमलँड सिटी कॉलनीतील मुख्य मार्गाचे सौंदर्यीकरण व्हावे, रस्ता सिमेंट काँक्रीटचा व्हावा अशी कॉलनी वासियांची अनेक दिवसांपासून मागणी होती.
मुख्य मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी ड्रीमलँड सिटीतील रहिवासी नागरिकांनी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व युवानेते बबलू सातपुते यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांची भेट घेतली व समस्या समजावून सांगितली.
देवरावदादांनी सुद्धा त्वरित पावले उचलत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना समस्येपासून अवगत करून दिले. तांत्रिक मान्यता घ्या, निधीची कमतरता पडल्यास पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून निधी आणू असे देवरावदादा म्हणाले. मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा तत्काळ रस्ता मंजुरीसाठी पाठवतो अशी ग्वाही दिली.
देवराव भोंगळे यांनी शासन स्थरावर सतत पाठपुरावा केला. आता ड्रीमलँड सिटीच्या मुख्य मार्गाला सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामास भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. रस्त्याच्या बांधकामाची सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे. हा रस्ता हायजेस्ट मशीन वापरून बांधण्यात येणार आहे त्यामुळे अवघ्या सात दिवसात काम पूर्ण होईल.
या रस्त्याचा फायदा सुखकर्ता गणेश मंदिराच्या भाविकांना दर्शनासाठी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
हा महत्त्वाचा रस्ता बांधून देण्याचे कार्य केल्याबद्दल ड्रीम लँडसिटी येथील नागरिक सुधाकर आसुटकर, सचिन राजूरकर, संकेत बोढे, नागोबा चामाटे, सुनील बावणे, सुनील ताजने, संदीप ताजने, रुपेश पिदुरकर, गजानन भोंगळे, संतोष गुप्ता, प्रवीण चूने, शरद मासिरकर, गजानन ठावरी, कोहळे भाऊ, सुरेश सातपुते, कोडापे भाऊ, मिलमिले भाऊ, अनमोल पाटील, दिनेश पिदुरकर, गायकवाड भाऊ, दिवाकर क्षीरसागर, विनोद भोस्कर, सुनील बावणे, नितीन थेरे, विलास वासेकर, नामदेव,गोपालजी शर्मा, दिनेश काकडे, मनोज डोंगर, दिलीप तुमराम,तुषार करमरकर, विनोद सिंग, साईनाथ पिंपळशेंडे, अबरार भैय्या, विरेंद्र गुप्ता, सुशील कुमार चौधरी, चमन सावरकर, गुलाबराव पाटील, किशोर जुमडे,विलास धोटे, काकडे, पाटील,गंगाराम बोरुळे, किशोर बेहरे राहुल यादव, काशीनाथ सिरसागर , शेख जमीर शेख कलीम, भीमराव आमटे, राहुल पोरगमवार, प्रशात दास, भास्कर पिदुरकर, भगत भाऊ नागपुरे, काळे भाऊ, यांनी देवरावदादा भोंगळे यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...