यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस:
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वेकोलि प्रबंधक अनंत ठाकरे, भाजपाचे अमोल थेरे, ट्रान्सपोर्ट युनियन घुग्घुसचे पदाधिकारी यांनी संयुक्तरित्या कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक होणाऱ्या जिओसी कोळसा खाण क्रमांक २ येथील बहिरमबाबा मंदिराच्या मागून बेलोरा पुलापर्यंत असलेल्या पर्यायी मार्गाची पाहणी केली.
सोमवार, ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजतापासून घुग्घुस-वणी-चंद्रपूर हा मार्ग जडवाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या राजीव रतन चौकात निर्माणाधीन रेल्वे उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. रहदारीला अडथळा निर्माण होवू नये म्हणून हा मार्ग प्रशासनाने बंद केला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वणीकडून घुग्घुस बसस्थानकाकडे जाण्यासाठी पाटाळा-कोंडा फाटा किंवा वरोरा-भद्रावती-ताडाळी-घुग्घुस मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे तसेच घुग्घुसकडून वणी जाण्यासाठी पडोली-भद्रावती-वरोरा मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
घुग्घुस परिसरात वेकोलि वणी क्षेत्राच्या नायगाव, निलजई, पैंनगंगा, मुंगोली अशा कोळसा खाणी आहे. घुग्घुस शहरातील अनेक ट्रक चालक-मालक यांच्या ट्रकांना कोळसा वाहतूक याच मार्गाने करावी लागते हा मार्ग बंद केल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार असल्याने ट्रान्सपोर्ट युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी व ट्रक चालक-मालकांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेतली व समस्या सांगितली त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना याबाबत कळविले त्यांनी क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंग यांच्याशी समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पर्यायी मार्ग सुरु करण्याचे आश्वासन दिले.
त्या अनुषंगाने भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वेकोलि प्रबंधक अनंत ठाकरे, भाजपाचे अमोल थेरे व ट्रक चालक मालकांनी पर्यायी मार्गाची पाहणी केली आणि जडवाहतुकीसाठी मार्ग सुरु करण्यात आला.
मार्ग सुरु झाल्याने ट्रक चालक मालकांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंग व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले.
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...