यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : शहरातील नागरिकांच्या ज्वलंत समस्या घेऊन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ घुग्घुस नगरपरिषदेत गेले त्याठिकाणी नागरिकांच्या समस्या समजून घेणारा व समस्या सोडविणारा जवाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन देत
नगरपरिषद मुर्दाबाद घोषणा देत निषेध आंदोलन केल्याने नगरपरिषद कार्यालयात काही काळा करिता तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेला व जवळपास पन्नास हजार लोकसंख्येच्या शहरात गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकाच झाल्या नाही
शहराला मिळालेली एकमेव महिला मुख्याधिकाऱ्यांनी शहराच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला मात्र त्या महिला अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करून त्यांना कामे करू दिली गेली नाही.
शेवटी नाइलाजाने त्यांनी इतरत्र बदली करून घेतली
तेव्हा पासून शहराला स्थायिक मुख्याधिकारी नसल्याने शहरातील कामे रेंगाळली आहे.
व शहरात निवडणूकाच झाल्या नसल्याने नगरसेवक व नगराध्यक्ष नसतांना नगरपरिषदे अंतर्गत होणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन हे भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्वतः करीत नगरपरिषदेच्या कामाचा फुकट श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
या संदर्भात मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांची प्रतिक्रिया घेतली
असता त्यांनी सदर उदघाटनाची नगरपरिषदेला माहिती नसून ते अवैधरित्या केल्या गेल्याचे सांगितले आहे.
रिकाम्या खुर्चीला दिलेल्या निवेदनात नगरपरिषदेच्या कामाचा श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाच्या अध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांनी घेतला असता त्यांच्यावर कारवाई करावी
शहरातील तुटलेल्या अवस्थेतील नाल्या तातळीने दुरुस्त करून घाणीने तुडूंब भरलेल्या गटारी तातळीने पाऊस पडण्यापूर्वी स्वच्छ करावे जेणेकरून नाल्यांचा घाणपाणी नागरिकांच्या घरात शिरू नये अमराई वॉर्डातील पथदिवे हे गेल्या अनेक दिवसापासून बंद असून नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे.
सदर पथदिवे तातळीने सुरू करावे,
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाचा मागील तीन महिन्यापासून वेतन झाला नसून ठेकेदारांचे बिल मात्र तातळीने मंजूर करण्यात आले आहे.
कामगारांचे वेतन तातळीने देण्यात यावे.शहरातील विविध धार्मिक स्थळ व सार्वजनिक स्थळाकरीता जवळपास अकरा हायमस्ट लाईट मंजूर झालेले असून याकामाचा भूमिपूजन व उदघाटन केवळ नगरपरिषदच्या अधिकाऱ्यानेच करावा व अश्या अनेक मुद्द्यांना घेऊन निवेदन देण्यात आले
याप्रसंगी महिला काँग्रेस शहर अध्यक्षा सौ. संगिता किशोर बोबडे, अनुसूचित जाती विभाग महिला अध्यक्षा सौ.दिप्ती सुजित सोनटक्के, जिल्हा महिला सचिव दुर्गा पाटील,संध्या मंडल,सौ.पुष्पा नक्षीने,सरस्वती कोवे,मंगला उगे,सुजाता सोनटक्के,माधुरी बजेय,मंगला ठाकरे,सुनीता पिपळकर,कुसुम कामतवार,कवडाबाई कामतवार,गिताबाई दुर्वे काँग्रेस नेते सैय्यद अनवर,शामरावजी बोबडे,तिरुपती महाकाली,अलीम शेख,रोशन दंतलवार,शेख शमीउद्दीन,अनुप भंडारी,मोसिम शेख,अजय उपाध्ये,थॉमस अर्नाकोंडा,शहजाद शेख,देव भंडारी,साहिल सैय्यद,सुनील पाटील,आकाश चिलका,कुमार रुद्रारप,अभिषेक सपडी,कपील गोगला,संदीप चटकी,सन्नी कुम्मरवार,साजिद अली,शाहरूख शेख,अंकुश सपाटे,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...