यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस शहरामध्ये मासेमारी करणाऱ्या ढीवर समाज बांधवांची संख्या खूप मोठी आहे. घुग्घुसमधील दोन्ही तलाव अपुरे पडत असल्यामुळे ढीवर समाज बांधवांसमोर उपजीविकेची मोठी समस्या निर्माण झाली होती.
रोजगारासाठी ढीवर समाज बांधव अनेक बाहेरील गावामध्ये मासेमारी करिता भटकत होते. ही समस्या घेऊन ढीवर समाज बांधवांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली. त्यानंतर लगेच जागेचा शोध घेण्यात आला. वेकोलिच्या पडीत जमिनीवर बांध बांधल्यास मोठ्या तलावाची निर्मिती होऊ शकते ही बाब भटकंती करतांना सर्वांना लक्षात आली.
लगेच देवराव भोंगळे यांनी वेकोलिचे महाप्रबंधक आभास सिंह यांच्याशी चर्चा केली. ढीवर समाज बांधवांच्या रोजगार निर्मितीसाठी तलावाची आवश्यकता त्यांनी वेकोलिचे महाप्रबंधक आभास सिंह यांना पटवून दिली.
वेकोलिचे महाप्रबंधक आभास सिंह यांनी वेकोलितर्फे तत्काळ मशीन उपलब्ध करून दिली. भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व वेकोलिचे महाप्रबंधक आभास सिंह यांच्या सहकार्याने मच्छीपालनासाठी ११ एकरच्या तलावाची निर्मिती करण्यात आली.
या तलावाच्या निर्मितीतून घुग्घुसच्या ढीवर समाज बांधवांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. त्या अनुषंगाने ढीवर समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे राजेश मोरपाका, ढीवर समाजाचे सतीश कामतवार, मारोती बोरवार, मंगेश नागपुरे, किरण कामतवार, अंकुश कामतवार, संतोष कामतवार, शंकर कामतवार, रवींद्र कामतवार, शंकर कार्लेकर, रवींद्र पचारे, संदीप कामतवार, रामदास दिघोरे, वसंता कामतवार, बंडू शिवरकर व सुनील मांढरे व समाज बांधव उपस्थित होते.
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...