आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले " यांच्या बद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या " इंडक्ट टेल्स " आणि " हिंदू पोस्ट " वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन सावली पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना देण्यात आले .
सविस्तर वृत्त असे की , " इंडिक्ट टेल्स " आणि " हिंदू पोस्ट " नामक मनुवादी वृत्ती असलेल्या भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक , आद्य समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेले आहे . शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडक्ट टेल्स ही वेबसाईट चालवते . यात सावित्रीबाई फुले यांची शाळा म्हणजे ब्रिटिश सैनिकांना मुली पुरवण्याची सोय , अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखांमध्ये करण्यात आलेली आहे . सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल " इंडीक टेल्स " च्या लेखात अतिशय अपमान जनक भाषेचा वापर करण्यात आलेला आहे . हे अत्यंत वेदनादाही आहे . शिव - फुले - शाहू - आंबेडकरांच्या महाराष्ट्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संताप जनक आणि घाणेरडा असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत .
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं . महिलांना शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे , शेणाचे प्रहार सुद्धा आपल्या अंगावर झेलले . समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले . या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आजही समाजातील दुष्ट प्रवृत्ती कडून प्रहार केल्या जात आहे . एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर चिखल फेक करीत आहेत . या पोर्टलवर इतिहासाची पुनर मांडणी या नावावर अक्षरशा इतिहासाची मोडतोड सुरू आहे . ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे .
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बदनामी बाबतचा विषय शासनाने गांभीर्याने घेऊन आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या " इंडिक टेल्स " आणि " हिंदू पोस्ट " वेबसाईटवर बंदी आणून सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सावली येथील अनिल गुरनुले सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरदीप कोनपत्तिवार नगरपंचायत सभापती नितेश रस्से , सभापती प्रीतम गेडाम नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले , सरपंच सुनील पाल , मनोज चौधरी , किशोर घोटेकर , श्रीधर सोनुले , दिनकर वाघाडे सुनील ढोले , कमलेश गेडाम , प्रशांत राइंचवार यांनी ठाणेदार सावली यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे .
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...